-
बॉलिवूडमधील आघाडीची दिग्दर्शिका म्हणून झोया अख्तर हे नाव चटकन आपल्या तोंडी येतं.
-
आई अभिनेत्री, वडील प्रसिद्ध लेखक आणि विवध कलागुण असलेला भाऊ अशा परिवारात झोयाला चित्रपटाची आवड निर्माण होणं ही काही वेगळी गोष्ट नाही.
-
लेखक, कवि, चित्रपटसृष्टीतील कलाकार यांच्या सानिध्यात लहानाची मोठी झालेली झोया हिने ‘लक बाय चान्स’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं.
-
झोयाला वैद्यकीय क्षेत्रात आणि लॉमध्ये करियर घडवायची इच्छा होती. पण ते शक्य न झाल्याने झोयाने मोर्चा चित्रपटनिर्मितीकडे वळवला.
-
पण झोयाला खरी ओळख ही ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातून मिळाली.
-
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ प्रमाणेच झोय आता ‘जी ले जरा’ या चित्रपटावर काम करत आहेत. यातही ३ मैत्रिणींची गोष्ट बघायला मिळणार आहे. आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ या तिघी यामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
-
प्रसिद्ध दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या ‘सलाम बॉम्बे’ हा चित्रपट पाहून झोयाला प्रेरणा मिळाली.
-
त्या एका चित्रपटाने झोयाचा चित्रपटक्षेत्राकडे बघायचा दृष्टिकोनच बदलला.
-
आता झोया शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य यांना घेऊन एक वेबसीरिज करणार आहे. लवकरच ती नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
Photos : वेगळे विषय हाताळणाऱ्या झोया अख्तरला ‘या’ चित्रपटातून मिळाली दिग्दर्शक व्हायची प्रेरणा
Web Title: Bollywood director zoya akhtar wanted to pursue her career in law but this film changed her mind avn