-
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूरही आई – वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन चित्रपटसृष्टीत आली.
-
‘सैराट’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आलेल्या ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवीने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले.
-
त्यानंतरही तिने ‘गुंजन सॅक्सेना’, ‘रुही’, ‘गुड लक जेरी’ अशा विविध चित्रपटातून कामं केली.
-
मात्र तिच्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर तिची तुलना तिच्या आईशी, म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी केली गेली.
-
श्रीदेवी यांच्या मानाने जान्हवीला चांगला अभिनय करता येत नाही असे म्हणत अनेकांनी तिच्यावर टिका केली होती.
-
आता यावर बोनी कपूर यांनी त्यांचे मत मांडत जान्हवीची बाजू घेतली आहे.
-
एखाद्या भूमिकेत शिरून ती उत्तमप्रकारे साकारणे ही श्रीदेवीची खासियत होती. जान्हवीनेही ते आत्मसात केलं आहे.
-
श्रीदेवीने लहान वयातच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली.
-
१५० ते २०० दक्षिणात्य चित्रपट केल्यानंतर उत्तर भारतातील लोकांनी श्रीदेवीचे काम पाहिले.
-
जान्हवीने तर आत्ताच तिचे करिअर सुरु केले आहे.
-
जान्हवीसाठी वेगळा प्रवास आहे आणि तो छान असणार याची मला खात्री आहे.
-
त्यामुळे श्रीदेवीच्या कोणत्याही कामाशी जान्हवीची तुलना करू नका.
श्रीदेवी आणि जान्हवी कपूर यांच्यात होणाऱ्या तुलनेवर बोनी कपूर यांनी केली महत्वाची विधाने
‘सैराट’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आलेल्या ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवीने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले.
Web Title: Boney kapoor expressed his views about janhavi and sridevi comparison rnv