-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे गौरव मोरे नावारुपाला आला.
-
फिल्टर पाड्याचा बच्चन या नावानेही त्याला आता ओळखलं जातं. गौरव आता मराठी चित्रपटांमध्येही काम करताना दिसतो.
-
इतकंच नव्हे तर त्याला जाहिरातींच्याही ऑफर येऊ लागल्या आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘हवाहवाई’ चित्रपट प्रदर्शित झाला. आता तो आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला आहे.
-
लंडनला गेला असताना त्याच्या मनामध्ये काय भावना आहेत याबाबत आता गौरवने खुलासा केला आहे.
-
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये गौरव म्हणाला, “मी आता लंडनमध्ये असल्याचा मला खूप आनंद वाटतो. मी लंडनमध्ये येऊन माझ्या चित्रपटासाठी चित्रीकरण करेन असं मला कधी वाटलंही नव्हतं. फक्त चित्रपट, वेबसीरिजमध्ये लंडन पाहिलं आहे. आता प्रत्यक्षात इथे येऊन मी चित्रीकरण करत आहे यावर मला अजूनही विश्वास बसत नाही.”
-
“मी माझ्या कुटुंबातील व चाळीमधील परदेशामध्ये आलेला पहिला व्यक्ती आहे याचा मला अभिमान वाटतो. अजूनही मी पवई येथील झोपडपट्टीमध्ये माझ्या कुटुंबाबरोबर राहतो.”
-
“मी आता अभिनेता आहे, माझे चाहते आहेत म्हणून याचा अर्थ असा नाही की मी जिथे राहतो ती जागा विसरेन.”
-
“चाळीमध्ये राहणारे माझे शेजारी कधी-कधी तर मला व्हिडीओ कॉल करतात. तसेच लंडनमधील परिसर दाखवण्यास सांगतात. मीही त्यांना लंडनमधील फोटो पाठवतो असतो.”
-
“लंडनचे फोटो तसेच व्हिडीओ कॉल झाल्यानंतर तेही खूश होता. त्यांचा आनंद पाहून मलाही फार आनंद वाटतो.”
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
“पवईच्या चाळीमध्ये राहतो पण…” लंडनला गेलेला गौरव मोरे तेथील अनुभव सांगताना भावुक
अभिनेता गौरव मोरे सध्या लंडनमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या अनुभवाबाबत बोलताना तो अगदी भावुक झाला.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem gaurav more share experience of shooting in london for marathi film see details kmd