• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame gaurav more shared his struggle story know about his long hair reason photos kak

Photos : “बेरोजगारीमुळे मी केस वाढवले पण…”, गौरव मोरेने सांगितला गुगलची अ‍ॅड मिळाल्याचा ‘तो’ किस्सा

गौरवच्या अभिनयाप्रमाणेच त्याची स्टाइल आणि झुपकेदार केस प्रेक्षकांना प्रचंड भावतात.

October 26, 2022 08:33 IST
Follow Us
  • reason behind gaurav more long hair
    1/15

    अभिनेता गौरव मोरे त्याच्या विनोदी अभिनयशैलीने प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतो.

  • 2/15

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनयाची छाप त्याने प्रेक्षकांवर पाडली.

  • 3/15

    याच कार्यक्रमातून गौरव घराघरात पोहोचला. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या गौरवचं फॅन फॉलोविंगही प्रचंड आहे.

  • 4/15

    फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख असलेल्या गौरवने हास्यजत्रेसाठी अनेक ऑडिशन दिल्या होत्या.

  • 5/15

    गौरवच्या अभिनयाप्रमाणेच त्याची स्टाइल आणि विशेष म्हणजे झुपकेदार केस प्रेक्षकांना प्रचंड भावतात.

  • 6/15

    नुकतीच ‘एबीपी वाहिनी’च्या ‘माझा कट्टा’ कार्यक्रमात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने हजेरी लावली. या मुलाखतीत हास्यजत्रेच्या पडद्यामागचे अनेक किस्से शेअर करण्यात आले.

  • 7/15

    या मुलाखतीत गौरवला त्याच्या झुपकेदार केसांबाबतही प्रश्न विचारण्यात आला. “तू असे केस का वाढवले आहेस?”, असा प्रश्न त्याला विचारला गेला.

  • 8/15

    यावर गौरवने त्याच्या खास शैलीत मजेशीरपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, “एक वेळ अशी होती, जेव्हा मला काम मिळत नव्हतं. म्हणून म्हटलं केस वाढवून बघुया”.

  • 9/15

    “या झुपकेदार केसांमुळेच मला गुगलची अ‍ॅड मिळाली. तुमचा लूक खूप छान आहे, असं ते म्हणाले. त्यानंतर मला पुढे लूकमुळेच काम मिळत गेलं”, असंही गौरवने सांगितलं.

  • 10/15

    तो पुढे म्हणाला, “प्रसाद खांडेकरबरोबर मी पहिल्यापासूनच काम करत होतो. पण हास्यजत्रेमुळे मला खरी ओळख मिळाली. सोनी मराठी टीम, सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सर यांच्यामुळे मी मोठा झालो”.

  • 11/15

    “आज मी जो काही आहे तो यांच्यामुळेच आहे. यांना मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. त्यांचा मी खूप मोठा ऋणी आहे”, असंही गौरव म्हणाला.

  • 12/15

    गौरव लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त तो नुकताच लंडनला जाऊन आला.

  • 13/15

    याआधी तो ‘हवाहवाई’ चित्रपटात झळकला होता.

  • 14/15

    (सर्व फोटो : गौरव मोरे/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा >> Photos : विजय देवरकोंडाचा फोटो पाहताच सायली संजीव लाजली, म्हणाली “माझं तुझ्यावर…”)

TOPICS
मनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actors

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame gaurav more shared his struggle story know about his long hair reason photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.