-
यंदा बिग बॉसचे चौथे पर्व विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. हे पर्व सुरु झाल्यापासून त्यात दिवसेंदिवस येणारे ट्विस्ट, स्पर्धकांचे मतभेद, कामांवरुन होणारे वाद आणि त्यांचा खेळ यावरुन बिग बॉसचे चौथे पर्व गाजताना दिसत आहे.
-
बिग बॉसच्या घरात नुकतंच एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एंट्री झाली आहे.
-
ही स्पर्धक नक्की कोण याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत होती. अखेर त्याचा खुलासा झाला आहे.
-
मराठी अभिनेत्री स्नेहलता वसईकर बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या पर्वाची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री करणारी स्पर्धक ठरली आहे.
-
स्नेहलता वसईकरच्या येण्याने बिग बॉसच्या घरातील समीकरण किती बदलणार? नात्यांमध्ये काय बदल होणार? याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे.
-
बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डद्वारे एंट्री करणारी स्नेहलता वसईकर नक्की कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
-
स्नेहलता वसईकर ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
-
अनेक मराठी मालिकांमुळे ती घराघरांत पोहचली.
-
तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे.
-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेमध्ये तिने ‘सोयरा बाईसाहेब’ ही भूमिका साकारली होती.
-
या भूमिकेमुळेच ती प्रसिद्धीझोतात आली. तिची ही भूमिका प्रचंड गाजली.
-
आजही अनेक प्रेक्षक तिला याच भूमिकेमुळे ओळखतात.
-
स्नेहलताने मराठीसह अनेक हिंदी मालिकात काम केले आहे.
-
स्नेहलताचा जन्म मुंबईत झाला असून तिने तिचे प्राथमिक शिक्षण जोगेश्वरीतील सरस्वती मंदिर येथे केले आहे.
-
त्यानंतर तिने कांदिवलीतील श्री एकविरा विद्यालय या ठिकाणी पुढील शिक्षण घेतले.
-
तिला लहानपणापासूनच अभिनय, नृत्य याची आवड होती. तिने शालेय जीवनात अनेक स्पर्धकांमध्येही सहभाग घेतला होता.
-
तिने साठ्ये महाविद्यालयातून तिचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
-
स्नेहलताने झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमातून करिअरला सुरुवात केली.
-
त्याबरोबरच तिने अनेक मालिकेतही काम केले.
-
गौतमाबाई , सोयराबाई, चंदा देशमाने अशा विविध व्यक्तिरेखा तिने मालिकांत साकारल्या आहेत.
-
‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे.
-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेतही ती झळकली होती.
-
स्नेहलता ही फिटनेस फ्रीक अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते
-
ऐतिहासिक भूमिका साकारत असतानाही अनेकदा बोल्ड फोटोशूटमुळे ती चर्चेत आली.
-
या लूकमुळे तिला ट्रोलर्सचाही सामना करावा लागला. मात्र त्यावर तिने सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सची तोंड बंद केली होती.
-
स्नेहलता ही विवाहित असून गिरीश वसईकर असे तिच्या पतीचे नाव आहे. तिला एक शौर्या नावाची पाच ते सहा वर्षांची मुलगी आहे.
ऐतिहासिक पात्र, बोल्ड फोटो अन् रोखठोक स्वभाव असलेल्या स्नेहलता वसईकरबद्दल माहितीये का?
स्नेहलता वसईकर बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या पर्वाची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री करणारी स्पर्धक ठरली आहे.
Web Title: Bigg boss marathi 4 show snehlata vasaikar first wild card know all about her nrp