-
अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ‘दृश्यम २’ या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे.
-
गोव्यामधील एका छोट्या गावामध्ये राहणाऱ्या विजय साळगावकरची गोष्ट या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली होती.
-
आता चित्रपटाच्या पहिल्या भागाची कथा सिक्वेलमध्ये पुढे नेण्यात येणार आहे.
-
सात वर्षानंतरही पोलीस आय.जी. मिरा देशमुखच्या मुलाचा म्हणजेच सॅमचा शोध घेत असल्याचे दिसून येणार आहे.
-
या प्रकरणावरून अनेकदा विजय साळगावकर पोलिस चौकशीला सामोरा गेलेला या चित्रपटात दिसणार आहे.
-
विशेष म्हणजे या चित्रपटात छोट्या पडद्यावरील एसीपी प्रद्युमन यांच्या सीआयडी टीमचीही एंट्री होणार आहे.
-
या पोलिसांपासून विजय त्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे. असे अनेक चढ उतार या चित्रपटात पहायला मिळतील.
-
‘दृश्यम २’ हा चित्रपट ५० कोटी बजेटमध्ये बनवला गेला असून या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट पहिल्याच दिवशी १० ते १५ कोटींची कमाई करेल अशी निर्मात्यांना खात्री वाटते.
-
हा चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
Photos: ‘अशी’ असेल ‘दृश्यम २’ची कथा, जाणून घ्या चित्रपटाबद्दलची गुपितं
हा चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
Web Title: Ajay devgan starrer drishyam 2 story will be super thrilling rnv