-
अभिनेता अक्षय कुमार हा सध्या खूपच चर्चेत आहे.
-
त्याला सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखलं जातं.
-
‘हेरा फेरी 3’ या चित्रपटासाठी त्याने ९० कोटींची मागणी केली होती असं समोर आलं होतं.
-
पण अक्षय कुमार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता नाही.
-
या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेलं नाव म्हणजे रजनीकांत. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार रजनीकांत यांनी ‘अन्नाथे’ चित्रपटासाठी १०० कोटी रुपये घेतले होते. इतकंच नाही तर त्यांनू आगामी अॅक्शन-ड्रामा चित्रपटासाठी १५० कोटी रुपये मानधन आकारले आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत पाठोपाठ कमल हसन यांनी त्यांच्या आगामी ‘इंडियन २’ चित्रपटासाठी १५० कोटी रुपये घेतले आहेत.
-
प्रभासने ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’साठी १२० कोटी रुपये मानधन आकरले आहे.
-
अल्लू अर्जुनने ‘पुष्पा पार्ट २’साठी १२० कोटी रुपये घेतले आहेत.
-
राम चरणने आता त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी १०० कोटी रुपये घेतले आहेत.
अक्षय कुमार नाही तर ‘हे’ दाक्षिणात्य अभिनेते आहेत सर्वाधिक कमाई करणारे कलाकार, मानधनाचे आकडे ऐकून व्हाल थक्क
केवळ अभिनयाच्या बाबतीतच नाही तर फीच्या बाबतीतही दाक्षिणात्य अभिनेते बॉलिवूड कलाकारांपेक्षा कमी नाहीत.
Web Title: Akshay kumar is not the high paid actor in indian film inductry rnv