-
पुढच्या काही दिवसांमध्ये २०२२ हे वर्ष संपणार आहे. यंदाचं हे वर्ष काही लोकांसाठी खूपच फायद्याचं राहिलं तर काहींसाठी डोकेदुखी ठरलं.
-
बॉलिवूड कलाकारांबद्दल बोलायचं तर काही कलाकारांसाठी हे वर्ष खूपच चांगलं गेलं मात्र काहींची नावं वादाच्या भोवऱ्यात अडकली.
-
वर्षाच्या अखेरीस एक नजर टाकूया अशा बॉलिवूड कलाकरांवर ज्यांची नावं वादग्रस्त कारणांनी राहिली होती चर्चेत.
-
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग यंदा त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे बराच चर्चेत राहिला.
-
अनेक संस्थांनी त्याच्या या फोटोशूटवर आक्षेप घेतल्यानंतर रणवीरनं त्याच्या काही फोटोंबरोबर छेडछाड केली गेल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.
-
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव ठग सुकेश चंद्रशेखरशी असलेल्या नातेसंबंधांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलं.
-
तिच्या विरोधात खटला दाखल करण्यात आली आणि तिची चौकशी झाली. सध्या तिला जामिनावर सोडण्यात आलं आहे.
-
अभिनेता रणबीर कपूरचं नाव यंदा त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. त्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
-
या व्हिडीओमध्ये रणबीरने त्याला गोमांस आवडत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका मंदिरात दर्शनासाठी प्रवेश नाकारण्यात आला होता.
-
रणबीर कपूरप्रमाणेच त्याची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टही या वर्षाअखेर बरीच चर्चेत राहिली.
-
आलियाने ७ व्या महिन्यात मुलीला जन्म दिल्यानंतर ती लग्नाआधीच गरोदर होती असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली होती.
-
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराने या वर्षी दिग्दर्शक विग्नेशशी लग्नगाठ बांधली.
-
मात्र लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच या दोघांनी सरोगसीद्वारे आई-बाबा झाल्याची घोषणा केली.
-
त्यानंतर या दोघांवरही सरोगसीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्यामुळे त्यांना न्यायलयात स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.
-
अभिनेत्री रिचा चड्ढाने काही दिवसांपूर्वीच आर्मीबाबत केलेलं ट्वीट वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं.
-
रिचा चड्ढावर या ट्वीटनंतर देशभरातून टीका करण्यात आली होती. यानंतर रिचाने भारतीय सैन्याची जाहीर माफी मागितली होती.
-
हे संपूर्ण वर्ष दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाने गाजवलं.
-
चित्रपटाच्या प्रमोशनवेळी आणि प्रदर्शनानंतर विवेक अग्निहोत्री त्यांच्या काही वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
न्यूड फोटोशूट ते वादग्रस्त वक्तव्य, ‘या’ कारणांनी चर्चेत राहिले बॉलिवूड कलाकार
काही बॉलिवूड कलाकारांसाठी २०२२ हे संपूर्ण वर्ष वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त राहिलं. या कलाकारांची नावं बरीच चर्चेत राहिली
Web Title: Ranveer singh to vivek agnihotri controversial bollywood celebrity in 2022 mrj