-
अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज पुण्यतिथी.
-
त्यांचा मुलगा प्रतीक बब्बर हा मनोरंजन सृष्टीत कार्यरत असून उत्तमोत्तम भूमिका साकारताना दिसतो.
-
सुरुवातीपासूनच प्रतीकची तुलना त्याची आई दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याशी होत आली आहे.
-
नुकतंच एका मुलाखतीत त्याने त्याची आई दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि त्याच्यामध्ये केल्या जाणाऱ्या तुलनेबद्दल भाष्य केलं होतं.
-
“माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण या सगळ्यात माझी आई ही माझी प्रेरणाशक्ती राहिली आहे.”
-
“माझं कुटुंब, माझं ध्येय आणि स्वप्ने यांनी मला पुढे जाण्याचं प्रोत्साहन दिलं आहे.”
-
“अनेकांनी मला नाकारले, आयुष्यभर अनेक गोष्टी सांगितल्या, मला त्या चुकीच्या सिद्ध करायच्या आहेत.”
-
“प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं एक उत्तम अभिनेता बनून सुपरहिट चित्रपट द्यावेत.”
-
“एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट द्यावेत आणि पैसे कमवावेत, नाव कमवावं असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं.”
-
“पण माझं ध्येय वेगळं आहे.”
-
“मला माझ्या आईकडून मिळालेला वारसा पुढे न्यायचा आहे.”
-
“स्मिता पाटील यांचा मी मुलगा आहे या गोष्टीला मला न्याय द्यायचा आहे,” असं प्रतीकने सांगितलं होतं.
“स्मिता पाटीलचा मुलगा म्हणून…” प्रतीक बब्बरने व्यक्त केली होती इच्छा
प्रतीक बब्बरने आतापर्यंत अनेकदा त्याच्या आईबद्दल त्याला वाटणाऱ्या भावना विविध माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
Web Title: Prateik babbar expressed his views about comparison between him and his mother rnv