-

छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री अनाया सोनी गेल्या दोन वर्षांपासून शारिरीक समस्यांमुळे त्रस्त आहे. सध्या ती डायलिसिसवर आहे.
-
‘मेरे साई’ या मालिकेमुळे अनाया नावारुपाला आली.
-
किडनी निकामी झाली असल्याचं अनायाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे.
-
शिवाय वाढत्या शारिरीक समस्यांमुळे अनायाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
-
‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनायाने तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. अनाया म्हणाली, “दोन दिवसांपूर्वीच मी ‘मेरे साई’ मालिकेच्या चित्रीकरणावरून घरी आले आहे.”
-
“डायलिसिसमुळे मी नियमित काम करू शकत नाही. ज्या दिवशी डायलिसिस असतं त्या दिवशी सेटवर जाणं मला शक्य होत नाही.”
-
“महिन्यातील १२ दिवस माझे यामध्येच निघून जातात. किडनी जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार आहे. प्रत्येक सेशनसाठी १५०० रुपये खर्च शिवाय औषधांचा खर्च वेगळा असतो.”
-
“औषधांच्या खर्चासह माझं घर भाडं तसेच इतर खर्च आहेत. शारीरिक समस्यांमुळे माझी कमाईही कमी झाली आहे. आता मी रुग्णालयाजवळ घर भाड्याने घेतलं आहे.”
-
“माझ्यावर उपचार होण्यासाठी पैसे जमा व्हावे म्हणून मी सोशल मीडियावर दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या असल्याची पोस्ट शेअर केली. पण त्याचा मलाच गैरफायदा झाला.”
-
“कामासाठी किंवा ऑडिशनसाठी मी जिथे जाते तिथे मला या आजारामुळे नकार मिळत आहे. कित्येकांनी माझ्या आजाराची खिल्लीही उडवली. तू तर अधिक पैसे कमावत आहेस, तुझ्याकडे पैसे जमा झाले असतील असं अनेकांनी मला म्हटलं.”
-
“पण त्याकडे मी दुर्लक्ष केलं. आता फक्त काम मिळत नसल्यामुळे मी खचले आहे. सोनू सूद तसेच ‘मेरे साई’च्या सेटवरील अनेक लोकांनी मला आजपर्यंत मदत केली आहे.”
-
२०१५मध्ये अनायाच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला किडनी दिली. पण करोनाकाळात ती किडनीही निकामी झाली. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
वडिलांनी दान केली स्वतःची किडनी, पुन्हा दोन्ही किडन्या निकामी, प्रसिद्ध अभिनेत्रीची बिकट अवस्था, भाड्याच्या घरात राहण्याची वेळ
प्रसिद्ध अभिनेत्री अनाया सोनीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. आता तिची परिस्थिती नेमकी कशी आहे? हे तिने स्वतः सांगितलं आहे.
Web Title: Mere sai serial actress anaya soni kidney failure she talk about her struggle see details kmd