• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. why onkar bhojne took exit from maharashtrachi hasyajatra director sachin goswami reveled the secret nrp

“तो पैशासाठी गेला…” ओंकार भोजनेच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मागील एक्झिटचं खरं कारण समोर

ओंकार भोजनेच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून एक्झिटचं खरं कारण समोर

Updated: December 21, 2022 12:40 IST
Follow Us
  • Onkar Bhojne 9
    1/24

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. कॉमेडी किंग अशी त्याची ओळख सांगितली जाते.

  • 2/24

    छोट्या पडद्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता ओंकार भोजने हा आता मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • 3/24

    ओंकार भोजने हा लवकरच ‘सरला एक कोटी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 4/24

    यामुळे ओंकार भोजनेच्या चाहते नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.

  • 5/24

    काही महिन्यांपूर्वी ओंकारने झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेला रामराम केला.

  • 6/24

    नुकतंच या सर्व प्रकाराबद्दल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी स्पष्ट मत मांडलं आहे.

  • 7/24

    दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी एका मुलाखतीत ओंकार भोजने हास्यजत्रा का सोडून गेला? याबद्दलही सांगितले.

  • 8/24

    “ओंकार भोजने हा उत्कृष्ट नट आहे. तो हास्यजत्रेत जेव्हा आला तेव्हाही त्याच्याकडे उत्तम क्षमता होती.”

  • 9/24

    “त्याआधीही त्याने काही ठिकाणी काम केली होती. त्याची वैशिष्ट्यं हेरता आली आणि त्यापद्धतीने पेरता आली तर तो उत्तमच ठरणार आहे.”

  • 10/24

    “तो एका प्रोडक्शनमधून दुसऱ्या प्रोडक्शनमध्ये जाणं यात काही गैर नाही. पण ज्या पद्धतीने लोकांनी ते मनाला लावून घेतलंय तसं मला काही फारसं वाटत नाही.”

  • 11/24

    “एखाद्या नटाने कार्यक्रम सोडून जाणं यात काहीही अडचण नाही. ओंकार हा चित्रपटासाठी गेला होता आणि तो तेच सांगून गेला होता.”

  • 12/24

    “आशिष पात्रे हा ओंकारचा फार चांगला मित्र आहे. त्याने त्याला सुरुवातीच्या काळात मदत केली. त्याची जाणीव ठेवणं हे आवश्यक आहे.”

  • 13/24

    “महाराष्ट्राची हास्यजत्रा उत्तम सुरु आहे. त्यामुळे आशिषच्या प्रोडक्शनला हातभार लावूया, फेमचा थोडासा वापर करुया, या उद्देशाने आणि मित्राला मदत करण्याच्या हेतून तो कदाचित तिथे गेला असावा.”

  • 14/24

    “पण अनेक लोकांनी पैशासाठी गेला वैगरे याबद्दल मला खरंच काहीही माहिती नाही. मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही.”

  • 15/24

    “त्याचे परिणाम काय होतात हा तो संच, चॅनल आणि त्यांचा अंतर्गत भाग आहे. पण आम्हाला कोणालाही त्याबद्दल काहीही राग वैगरे नाही.”

  • 16/24

    “फक्त त्याने आधी येऊन सांगितलं असतं तर बरं वाटलं असतं. यापूर्वीही त्याने असं केलं होतं.”

  • 17/24

    “तेव्हा आम्ही त्याला जा असे सांगितले होते. त्यानंतरही तो हास्यजत्रेत आला तेव्हाच त्याचा प्रभाव पडला होता.”

  • 18/24

    “कारण ओंकारवर फक्त एकटा तोच काम करत नाही. संपूर्ण टीम त्यावर काम करत असते.”

  • 19/24

    “लेखकांची आठ जणांची टीम, आम्ही, सहकलाकार हे सर्वजण एकत्र येऊन एक कलाकृती तयार होते. कदाचित तो शो नवीन आहे.”

  • 20/24

    “त्याला तिथे सेट व्हायला वेळ लागेल. तो होईल त्यात काही दुमत नाही.”

  • “पण तिथला परफॉर्मन्स आणि या ठिकाणचा परफॉर्मन्स याची तुलना करण्याची माझी इच्छा नाही. पण लोक ट्रोल करतात याचं मला वाईट वाटतं. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य द्यायला हवं”, असे सचिन गोस्वामी यांनी म्हटले.
  • 21/24

    दरम्यान ओंकार हा सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण यांची निर्मित “सरला एक कोटी’’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

  • 22/24

    याची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे. तर विनोद नाईक कार्यकारी निर्माते आहेत.

  • 23/24

    हा चित्रपट येत्या २० जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Why onkar bhojne took exit from maharashtrachi hasyajatra director sachin goswami reveled the secret nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.