-
अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या ‘तू तेव्हा तशी’ मालिकेमुळे चर्चेत आहे.
-
या मालिकेमध्ये ती साकारत असलेलं वल्ली हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडत आहे.
-
पण बऱ्याचदा तिच्या वाट्याला नकारात्मक भूमिका आल्या.
-
वल्ली हे पात्रही नकारात्मक आहे.
-
नकारात्मक भूमिका साकारणं अभिज्ञाला आवडतं का? याबाबत तिने ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
-
ती म्हणाली, “मला नकारात्मक भूमिका करायला अजिबात आवडत नाहीत. मी मुळातच तशी नाही. मला आजपर्यंत ज्या भूमिका मिळत गेल्या त्याच्या मी अगदी विरुद्ध आहे. मी या भूमिका उत्तम करु शकले कारण माझा तसा स्वभाव नाही.”
-
“पण तुम्ही अभिज्ञा भावेला विचारलत तर मला नकारात्मक भूमिका आवडत नाहीत. कलाकार म्हणून मला या भूमिका आवडतील. पण प्रेक्षक म्हणून मला या भूमिका आवडणार नाही.”
-
“पण मी अशी आशा करते की मला सकारात्मक भूमिका करायला मिळतील. नकारात्मक भूमिकांमुळे सतत चाहत्यांकडून मला टोमणे ऐकायला मिळतात.”
-
“तू अशा भूमिका का करते, आम्हाला तुला धरुन मारावसं वाटतं, तुला नॉमिनेशन असलं तरी आम्ही वोट करणार नाही. अशा अनेक कमेंट चाहते करतात.”
-
“नातेवाईक सोडा माझी आजीच मला टीव्हीसमोर बसून शिव्या देते. असं का वागते? आमचे हेच संस्कार आहेत का? असंही माझी आजी बोलते.”
-
“मला खूप भारी वाटतं. कारण कुठेतरी माझ्या त्या भूमिकेवर ती विश्वास ठेवते. हिच माझ्या कामाची पोचपावती आहे.” (सर्व फोटो – फेसबुक)
“आजी टीव्हीसमोर बसून मला शिव्या देते कारण…” ‘तू तेव्हा तशी’मधील वल्लीचा खुलासा
अभिनेत्री अभिज्ञा भावेने तिच्या नकारात्मक भूमिकांबाबत भाष्य केलं आहे. याचबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
Web Title: Abhidnya bhave talk about her negative roles in marathi serial says my grand mother and fans angry on me see details kmd