-
अभिनेता बॉबी देओलने गेली अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये काम केले आहे, पण एक वेळ अशी आली जेव्हा त्याला चित्रपटांमध्ये काम मिळणे कठीण झाले.
-
नंतर बॉबी देओलला ओटीटी प्लॅटफॉर्मवरून एक नवी ओळख मिळाली. एमएक्स प्लेयरवर रिलीज झालेल्या ‘आश्रम’ या वेब सीरिजने बॉबी देओलला लोकप्रियता मिळवून दिली. बॉबी देओलच्या दमदार अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बॉबीने ‘बाबा निराला’ची भूमिका साकारली होती.
-
चित्रपटात करीअर घडवण्यासाठी मुंबईत आलेल्या जितेंद्र कुमारला बॉलिवूडमध्ये बरीच वर्षं काम मिळत नव्हतं. नंतर युट्यूबच्या ‘टीव्हीएफ’चॅनलच्या माध्यमातून जितेंद्रला ओळख मिळाली.
-
ओटीटीच्या विश्वात जितेंद्रला ‘जीतू भैया’ म्हणून ओळख मिळाली. जितेंद्र अनेक वेबसीरिजमध्ये दिसला आहे. ‘पंचायत’ या वेबसीरिजमधून जितेंद्रला खरी ओळख मिळाली. या वेबसीरिजची कथा खेडेगावावर आधारित आहे. या वेबसीरिजमधील जितेंद्र कुमारच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.
-
आमिर खानच्या बहुचर्चित ‘३ इडियट्स’ या चित्रपटातून अभिनेता अली फजलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्याला सर्वात जास्त ओळख ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मिळाली.
-
प्राइम व्हिडिओच्या ‘मिर्जापुर’ या वेबसीरिजने अली फजलला खरी ओळख मिळवून दिली. यामधील ‘गुड्डू भैय्या’ हे पात्र लोकांच्या चांगल्याच पसंतीस पडलं.
-
‘मिर्जापुर’ या वेबसीरिजने अली फजलबरोबरच अभिनेते पंकज त्रिपाठी यांनाही लोकप्रियता मिळाली. चित्रपटक्षेत्रात पंकज यांना ओळख मिळाली होतीच, पण या वेबसीरिजमुळे त्यांच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली.
-
बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवणारा अभिनेता सैफ अली खानवरही चित्रपट न मिळण्याची वेळ आली होती.
-
नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ या पहिल्या भारतीय वेबसीरिजमधून संधी मिळाली आणि या सीरिजमधून मनोरंजनक्षेत्रातील सैफची सेकंड इनिंग सुरू झाली. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
चित्रपट मिळायचं थांबल्यावर ‘या’ अभिनेत्यांनी घेतला ओटीटीचा आधार, अन् केलं जबरदस्त कमबॅक
या अभिनेत्यांचं बुडतं करिअर ओटीटीमुळे वाचलं
Web Title: Bollywood actors like pankaj tripathi ali fazal got success on ott platforms after films avn