• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tv actress tunisha sharma committed suicide know what happened on alibaba dastan e kabul set photos kak

Photos: तुनिषा शर्माने शूटिंगदरम्यानच केली आत्महत्या; मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं?

Tunisha Sharma Death: तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवरच गळफास लावून जीवन संपवलं.

December 24, 2022 20:37 IST
Follow Us
  • tunisha sharma comitted suicide photos
    1/15

    सोनी सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ची मुख्य अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे.

  • 2/15

    मालिकेच्या सेटवरच गळफास लावून तिने जीवन संपवलं.

  • 3/15

    २० वर्षीय तुनिषाने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती.

  • 4/15

    तुनिषा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३ ‘ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती.

  • 5/15

    तुनिषाने आत्महत्या करण्याच्या सहा तासांपूर्वीच सेटवरचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला होता.

  • 6/15

    या व्हिडीओमध्ये ती सेटवर शूटसाठी मेकअप करताना दिसत होती.

  • 7/15

    काही तासांपूर्वी तिने स्वत:चा एक फोटोही इन्स्टाग्राम शेअर केला होता. “कामाची आवड असलेल्या व्यक्ती कधीच थांबत नाहीत”, असं कॅप्शन दिलं होतं.

  • 8/15

    त्यामुळे ती असं काही करेल, असं कोणाच्या ध्यानीमनीही नव्हतं. पोस्ट शेअर केल्यानंतर काही तासांतच आत्महत्या केल्याने तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

  • 9/15

    तुनिषाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण सेटवर नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया.

  • 10/15

    वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “फिल्मसिटीमधील रामदेव स्टुडिओमध्ये मालिकेचं शूटिंग सुरू होतं. शूटिंगदरम्यान थोडा वेळ ब्रेक देण्यात आला होता”.

  • 11/15

    “ब्रेकदरम्यान तुनिषा बाथरुममध्ये गेली आणि तेथील फॅनला गळफास घेत तिने आत्महत्या केली”.

  • 12/15

    “त्यानंतर सेटवरील लोकांनी तिला रुग्णालयात नेलं. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे”, असं ते म्हणाले.

  • 13/15

    “तुनिषाने नेमकी आत्महत्या का केली? तसेच तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती का? त्याचा आम्ही तपास करत आहोत”, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो: तुनिषा शर्मा/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा>>Photos: १४व्या मजल्यावरुन उडी मारल्यानंतर जिवंत होती दिशा सालियन पण…; त्या रात्री नेमकं काय घडलं? मित्रानेच केला होता खुलासा )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tv actress tunisha sharma committed suicide know what happened on alibaba dastan e kabul set photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.