-
वर्ष २०२३ ची धमकेदार सुरुवात झाली आहे. नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात शाहरुख खान आणि सलमान खानसह अनेक कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज आहेत.
-
इतकंच नाही तर या नवीन वर्षं अनेक स्टारकिड्स देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार आहेत. आज आपण अशाच काही स्टारकिड्सच्या आगामी चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.
-
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली या वर्षी धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. विशेष म्हणजे काजोलही या चित्रपटात असणार आहे.
-
आमिर खानचा मुलगा जुनैदही यावर्षी ‘महाराज या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
-
चंकी पांडेचा मुलगा ‘अहान पांडे’ही याच वर्षी अजय देवगणसह एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
-
शाहरुख खानची मुलगी सुहाना २०२३ मध्ये झोया अख्तरच्या ‘आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
-
सलमान खानची बहीण अलविरा खानची मुलगी अलीजेह अग्निहोत्री सौमेंद्र पाधीच्या नवीन चित्रपटातून पदार्पण करत आहे.
-
अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी यावर्षी सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
-
हृतिक रोशनची चुलत बहीण आणि संगीतकार राजेश रोशनची मुलगी पश्मिना रोशन देखील २०२३ मध्ये इश्क विश्कच्या सिक्वेलद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
इब्राहिम अली खान ते सुहाना; 2023 मध्ये ‘या’ स्टारकिड्सचं होणार दमदार पदार्पण
या नवीन वर्षं अनेक स्टारकिड्स देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार आहेत. आज आपण अशाच काही स्टारकिड्सच्या आगामी चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.
Web Title: Son of saif ali khan sister of hrithik roshan these starkids will make a strong debut in 2023 bollywood pvp