-
या नवीन वर्षात बॉलिवूडचे अनेक कलाकार आणि चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. येणाऱ्या नवीन वर्षात अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
-
गेले २०२२ वर्ष हे हिंदी सीने सृष्टीसाठी अतिशय कठीण आणि नुकसानदायक ठरले. त्यामुळेचे येणारे वर्ष बॉलिवूडसाठी चांगले जावे हीच सर्वांची इच्छा आहे.
-
गेल्या वर्षी दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी चित्रपटांना धूळ चारली. केवळ दक्षिण भारतच नाही तर अनेक चित्रपटांनी संपूर्ण देशात कोट्यावधीची कमाई केली आहे.
-
म्हणूनच येणाऱ्या वर्षात हिंदीबरोबरच अनेक दाक्षिणात्य चित्रपटही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत.
-
२०२२ मध्ये, पुष्पा आणि आरआरआर सारख्या अनेक पॅन इंडिया चित्रपटांनी धूम केली. या वर्षीही अनेक भारतातील चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत. चला जाणून घेऊया या चित्रपटांची नावे.
-
प्रभास, सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘आदिपुरुष’ या वर्षी जानेवारीच्या अखेरीस रिलीज होणार आहे.
-
येणाऱ्या वर्षात ‘पीएस२’ चित्रपटसुद्धा संपूर्ण देशात रिलीज होणार आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
प्रभासचा ‘सालार’ चित्रपटही या वर्षी जून महिन्यात अनेक भाषांमध्ये रिलीज होत आहे.
-
पुष्पाच्या यशानंतर चाहते ‘पुष्पा २’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा २ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित होईल.
-
दीपिका पदुकोण आणि प्रभासचा आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ देखील याच वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनही आहेत.
-
सामंथा रुथचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपटही याच वर्षी अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.
-
(Photos: Social Media)
२०२३ मध्येही दाक्षिणात्य चित्रपट गाजवणार बॉक्स ऑफिस? प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांमध्ये ‘या’ चित्रपटांची क्रेझ
२०२२ मध्ये, पुष्पा आणि आरआरआर सारख्या अनेक पॅन इंडिया चित्रपटांनी धूम केली. या वर्षीही अनेक भारतातील चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत.
Web Title: South movies will dominate the box office even in 2023 the craze of these films among the audience even before the release pvp