-
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या त्यांच्या गाण्यामुळे चर्चेत आहेत.
-
‘मूड बना लिया’ हे अमृता यांचं नवं गाणं प्रदर्शित होताच याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
-
अमृता यांच्या या गाण्याला काही जणांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
-
तर काहींनी अमृता यांचं गाणं पाहून त्यांना ट्रोल केलं आहे.
-
अमृता फडणवीस यांच्या या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
-
गाण्याची त्याचबरोबरीने अभिनयाची आवड असलेल्या अमृता यांची संपत्ती अगदी थक्क करणारी आहे.
-
अमृता यांनी २ कोटी ३३ लाखांची गुंतवणूक शेअरमध्ये केली आहे.
-
तसेच एलआयसीमध्ये त्यांनी ५ लाख ९२ हजार रुपये गुंतवले आहेत.
-
अमृता यांच्याकडे ३४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत.
-
जवळपास ६० लाख किंमती शेतजमीन अमृता यांच्या नावावर आहे.
-
नागपूरमध्ये त्यांच्या नावावर फ्लॅट आहे. त्याची किंमत ३५ लाख रुपये इतकी आहे.
-
अमृता यांच्या नावावर ६२ लाख रुपयांचं कर्ज आहे. (सर्व फोटो – फेसबुक)
Photos : घर, सोन्याचे दागिने अन् शेतजमीन; कोट्यवधींची मालकीण असलेल्या अमृता फडणवीसांवर आहे ६२ लाखांचं कर्ज
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या त्यांच्या ‘मूड बना लिया’ गाण्यामुळे चर्चेत आहेत. कलाक्षेत्राची आवड असणाऱ्या अमृता यांची एकूण संपत्ती किती आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.
Web Title: Deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis total property see details kmd