-
अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ या चित्रपटवरून सुरू असलेला वाद थांबायचे नावच घेत नाही आहे.
-
देशभरातून होणाऱ्या तीव्र विरोधानंतर आता सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्यास सांगितले आहेत.
-
यानंतर या चित्रपटामध्ये कोणकोणते बदल होणार आहेत याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. सेन्सॉर बोर्डाने वादग्रस्त ‘पठाण’ चित्रपटातून कोणते दृश्य हटवण्यास सांगितले आहे याबाबत आज आपण जाणून घेऊया.
-
पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यातील नितंब दिसणारे क्लोजअप शॉर्ट्स, अश्लील नृत्य, तसेच सोनेरी बिकनीमधील साइड पोजला हटवण्याच्या सूचना केल्या आहे.
-
चित्रपटातील कर्नल लुथरा संभाषणातील वापरण्यात आलेला ‘रॉ’ हा शब्द बदलून ‘हमारे’ असं करण्यास सांगितलं आहे.
-
चित्रपटातील ‘लगंडे-लुले’ या शब्दांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप दर्शवला आहे. या शब्दाच्या जागी ‘टूटे-फुटे’ हा शब्दप्रयोग वापरण्याचा सल्ला दिला आहे.
-
चित्रपटात अनेक ठिकाणी PMO आणि PM या शब्दांचा वापर केला आहे. या ठिकाणी ‘प्रेसिडेंट’ किंवा ‘मिनिस्टर’ वापरण्यास सांगितले आहे.
-
चित्रपटात वापरण्यात आलेल्या ‘अशोक चक्र’ या शब्दाच्या जागी ‘वीर चक्र’ हा शब्द वापरण्यास सांगण्यात आले आहे.
-
पठाण चित्रपटात एक पात्र रॉ अधिकाऱ्याची भूमिका बजावत आहे, त्यातही बदल करण्याचा सल्ला सेन्सॉर बोर्डकडून देण्यात आला आहे.
-
चित्रपटातील एक संवादात ‘मिसेज भारत’ अशा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. त्याच्या जागी ‘हमारी माता’ वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-
चित्रपटातील एका दृश्यात सब टायटल्समध्ये ‘ब्लॅक प्रिजन रूस’ असे लिहण्यात आले आहे. त्या जागी ‘ब्लॅक प्रिजन’ असा बदल करण्यास सुचवले आहे.
-
चित्रपटातील ‘इससे सस्ती स्कॉच नही मिलती’ या संवादातील ‘स्कॉच’ शब्दाला ‘ड्रिंक्स’ या शब्दाने बदलण्यास सांगितले आहे.
-
सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचे शीर्षक आणि सौजन्य इंग्रजीसह हिंदी भाषेतही लिहण्यास सांगितले आहे. (Photos: Social Media)
दीपिकाचा बोल्ड लूक ते ‘लंगडा-लुळा’ शब्द, ‘पठाण’मधील ‘या’ दृश्यांना लागणार कात्री
‘पठाण’ चित्रपटामध्ये कोणकोणते बदल होणार आहेत याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. सेन्सॉर बोर्डाने वादग्रस्त ‘पठाण’ चित्रपटातून कोणते दृश्य हटवण्यास सांगितले आहे याबाबत आज आपण जाणून घेऊया.
Web Title: Censor board of india in going to cut controversial scenes from pathaan movie pvp