-
सध्याच्या घडीला मनोरंजन विश्वात फक्त ऑस्करचीच चर्चा आहे. ऑस्करच्या नामांकनामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये पाच भारतीय चित्रपटांनी आपले स्थान निश्चित केले आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीदेखील नामांकन मिळाले आहे. (Reuters)
-
या पांच चित्रपटांमध्ये ‘छेल्लो शो’, ‘आरआरआर’, ‘गंगूबाई काठियावाड़ी’, ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘कांतारा’ या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांच्या वैशिष्ट्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
-
अकॅडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स (AMPAS) ने ऑस्करसाठी पात्र ठरलेल्या ३०१ चित्रपटांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. पहिल्यांदाच असे झाले आहे की भारताने ऑस्करच्या चार विभागांमध्ये नामांकन मिळवले आहे. नामांकनासाठी १२-१७ जानेवारीपर्यंत मतदान होणार आहे. यानंतर २४ जानेवारीला अंतिम नामांकनाची यादी जाहीर होईल.
-
गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट या विभागामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या नावाचा अर्थ ‘द लास्ट फिल्म शो’ असा होतो. पेन नलिन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तर अभिनेता भाविन रबाडीने या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय प्लेटफॉर्मवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट भारतात १४ ऑक्टोबर २०२२ला प्रदर्शित झाला.
-
दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध दिग्दर्शक एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाचे अनेक स्तरावर कौतुक झाले. या चित्रपटाने मोठी कमाई केली आणि त्याचबरोबर अनेक विक्रमही आपल्या नावे केले.
-
‘बेस्ट ओरिजिनल सॉन्ग’च्या यादी मध्ये या चित्रपटातील ‘नाटु नाटु’ या गाण्याला स्थान मिळाले आहे. रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे राहुल सिपलीगुंज आणि काला भैरवा यांनी गायले आहे. तर एम. एम. किरावानी यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे.
-
संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाड़ी’ या चित्रपटाचा रिमाइंडर लिस्टमध्ये समावेश झाला आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसली. २५ फेब्रुवारी २०२२ ल प्रदर्शित झालेला हा चित्रपट एका माफिया क्वीनवर आधारित होता. या चित्रपटात आलियाने कीलया कामाचे सर्वच स्तरावर कौतुक झाले.
-
११ मार्च २०२२ ला प्रदर्शित झालेला विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला. वादामध्ये अडकलेला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
-
काश्मीरमधील क्रूर हत्याकांडावर आधारित या चित्रपटालाही रिमाइंडर लिस्टमध्ये स्थान मिळाले आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आदींच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
-
केरळच्या कोस्टल एरियाच्या परंपरेवर आधारित, ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत ‘कांतारा’ या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली. हा चित्रपट या वर्षातील सर्वात प्रभावी चित्रपट म्हणून उदयास आला.
-
या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट या विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत.
-
विशेष म्हणजे भारताच्या वतीने अधिकृतरीत्या ‘छेलो शो’, ‘द काश्मीर फाइल्स’, मराठी चित्रपट ‘मी वसंतराव’ आणि ‘तुझ्यासाठी काहीही’, ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’, ‘इरावीन निऱ्हाळ’ आणि कन्नड चित्रपट ‘विक्रांत रोना’ हे चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आले होते. ऑस्कर ऑस्करचा मुख्य पुरस्कार सोहळा १२ मार्च २०२३ रोजी होणार आहे.
Oscar Nominations: ‘कांतारा’ ते ‘द काश्मीर फाइल्स’; ऑस्करच्या शर्यतीत असलेल्या चित्रपटांबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?
पहिल्यांदाच असे झाले आहे की भारताने ऑस्करच्या चार विभागांमध्ये नामांकन मिळवले आहे. नामांकनासाठी १२-१७ जानेवारीपर्यंत मतदान होणार आहे.
Web Title: Oscar nominations kantara the kashmir files know interesting things about movies in the race pvp