-

दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजिनल गाण्यासाठी गोल्डन ग्लोब्स पुरस्कार मिळाला आहे.
-
या गाण्याचे संगीतकार एम एम केरावनी यांनी पुरस्काराच्या घोषणेनंतर मंचावर जाऊन ट्रॉफी घेतली त्यानंतर त्यांनी पुरस्कारासह फोटोसाठी पोजही दिली.
-
या गाण्याची सध्या जोरदार चर्चा आहे. पुरस्कार सोहळ्याला कलाकार आपल्या कुटुंबाबरोबर उपस्थित होते. यातील जुनियर एनटीआर आणि राम चरणचा डान्स विशेष लोकप्रिय ठरला आहे.
-
यातील जुनियर एनटीआर आणि राम चरणचा डान्स विशेष लोकप्रिय ठरला आहे. या गाण्यावरचा डान्स प्रेम रक्षितने कोरियोग्राफ केला आहे, त्याने मध्यंतरी एका मुलाखतीत यामागचे किस्से सांगितले आहेत. हे गाणे २०२१ साली युक्रेनमध्ये चित्रित करण्यात आले आहे.
-
तो असं म्हणाला की “या गाण्यासाठी दोन्ही अभिनेत्यांनी तब्बल ३० दिवस प्रॅक्टिस केली होती तसेच हे गाणे चित्रित व्हायला २ आठवडे लागले होते.”
-
“हे गाणे करताना मला दिग्दर्शक राजमौली यांनी मला हे गाणे सांगितले आणि यामागची कल्पना दिली त्याप्रमाणे मी या गाण्यासाठी ९७ स्टेप्स बसवल्या होत्या. सुरवातीला या गाण्यात १०० डान्सर्स मागे असणार होते मात्र नंतर आम्ही ती कल्पना काढून टाकली.”
-
हा चित्रपट क्रांतिकारी अल्लूरी सीताराम राजू, कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित असून जगभरात १४०० कोटींची कमाई केली आहे.
-
या चित्रपटात अजय देवगण, आलिया भट्ट यांच्यादेखील भूमिका आहेत. त्यांनी पहिल्यांदा तेलगू चित्रपटात काम केले आहे.
-
ऑस्करसाठीही शॉर्टलिस्ट झाल्यानंतर एखाद्या श्रेणीमध्ये ‘RRR’’ला नामांकन मिळावं अशी भारतीयांची अपेक्षा आहे.फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस /इन्स्टाग्राम
Photos : युक्रेनमध्ये चित्रीकरण, ३० दिवसांची मेहनत; ‘नाटू नाटू’ गाण्यामागच्या ‘या’ गोष्टी माहित्येत का?
मनोरंजनसृष्टीतील कित्येक कलाकारांनीही राजामौली आणि ‘आरआरआर’च्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे
Web Title: Photos to know more facts about of golden globe award song naatu naatu from rrr film spg