-
गेल्या काही दिवसांपासून भारताचा स्टार क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. नुकतंच दोघांनी दुबईमध्ये एकत्र नवीन वर्ष साजरे केले.
-
अनेक महिन्यांपासून राहुल आणि अथिया एकमेकांना डेट करत आहेत. मात्र त्यांच्या लग्नाबद्दल अद्याप काही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरीही मिळालेल्या माहितीनुसार अथिया आणि राहुलच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.
-
लवकरच हे जोडपे लग्नबंधनात अडकणार आहे. आज आपण त्यांच्या लग्नसोहळ्याबाबत तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत.
-
काही दिवसांपूर्वीच सुनील शेट्टी यांनी अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाबाबत मोठा खुलासा करत म्हटले होते की हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकतील. तथापि, अद्याप त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत अधिकृत माहिती हाती लागली नाही आहे.
-
असे असले तरीही सध्या हे जोडपे लग्नाच्या तयारीमध्ये व्यग्र आहे. दोघेही आपल्या लग्नासाठी शॉपिंग करत आहेत.
-
इंडिया टूडेच्या वृत्तानुसार अथिया आणि केएल राहुल २३ जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांचा शाही विवाहसोहळा तीन दिवस चालणार आहे. म्हणजेच २१ जानेवारी ते २३ जानेवारीदरम्यान त्यांच्या लग्नाच्या सर्व विधी पार पडतील.
-
मिळालेल्या माहितीनुसार २१ आणि २२ जानेवारीला हळदी, मेहेंदी आणि संगीत समारंभ असण्याची शक्यता आहे. तर २३ जानेवारीला केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा विवाह सोहळा पार पडेल.
-
तथापि, अद्याप केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या कुटुंबियांकडून याबाबत कोणत्याही गोष्टीची पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांचे लग्न सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील बांगल्यामध्ये पार पडेल.
केएल राहुल आणि अथियाच्या शाही विवाहसोहळ्याची जय्यत तयारी; ‘या’ दिवशी होणार मेहेंदी-संगीत समारंभ
गेल्या काही दिवसांपासून भारताचा स्टार क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.
Web Title: Kl rahul and athiya triumphant preparations for royal wedding a mehendi sangeet ceremony will be held on this day pvp