-
‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाद्वारे घराघरात ‘भावोजी’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या आदेश बांदेकर यांचा आज वाढदिवस.
-
आदेश बांदेकर हे अभिनेते-सुत्रसंचालक म्हणून कायमच चर्चेत असतात.
-
महाराष्ट्रातील सगळ्यांचे लाडके भावोजी म्हणून ते घराघरात लोकप्रिय आहेत.
-
आदेश बांदेकर हे सिनेसृष्टीसह राजकारणातही सक्रीय असल्याचे पाहायला मिळते.
-
आदेश बांदेकर यांनी सप्टेंबर २००९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.
-
त्यांनी २००९ मध्ये माहिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.
-
मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.
-
त्यानंतरही त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली त्यांचे काम सुरू ठेवले.
-
त्यानंतर जुलै २०१७ मध्ये आदेश बांदेकर यांची श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
-
२०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देखील देण्यात आला होता.
-
त्यानंतर जुलै २०२० पासून पुढील तीन वर्षांसाठी आदेश बांदेकर यांची श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली.
-
पण श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवडी होण्यामागे एक मोठा किस्सा आहे.
-
नुकतंच एका मुलाखतीत आदेश बांदेकरांनी याबद्दल सांगितले होते.
-
“मी आज जे काही आहे ते केवळ गणपतीचे आशीर्वाद आहेत म्हणून आहे.”
-
“तो आपलं आराध्य दैवत असला तरी त्याचं आणि माझं खास नातं आहे. त्याचे संकेत त्याने वेळोवेळी दिले आहेत.”
-
“एवढंच नाही तर माझ्या आयुष्यातील सूर, ताल, लय जे काही आहे, ते केवळ या गणेशोत्सवामुळेच आहे.”
-
“माझं बालपण काळचौकीतील अभ्युदय नगर या ठिकाणी गेले.”
-
“अभ्युदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाशी माझं वेगळं नातं आहे. ४३ इमारतींचा मिळून बसणारा हा बाप्पा म्हणजे आम्हाला आमच्या कुटुंबाचा वाटायचा.”
-
“अभ्युदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाशी माझं वेगळं नातं आहे. ४३ इमारतींचा मिळून बसणारा हा बाप्पा म्हणजे आम्हाला आमच्या कुटुंबाचा वाटायचा.”
-
“या मंडळाप्रमाणेच ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ हे देखील मला तितकेच जवळचे होते.”
-
“मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी अनंत चतुर्दशीला मात्र मुंबईतच असतो.”
-
“मी अभ्युदय नगरच्या राजाच्या मिरवणुकीत, लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत नाचताना किंवा ढोल वाजवताना दिसणारच हा कित्येक वर्षांचा ठरलेला कार्यक्रम आहे.”
-
“काही वर्षांपूर्वी शिवसेना प्रवेशानंतर मी कामानिमित्त पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात गेलो होतो.”
-
“बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर पडलो. त्यानंतर मला उद्धव ठाकरे साहेबांचा फोन आला.”
-
ते म्हणाले, “आदेश तुम्हाला सिद्धीविनायकाची जबाबदारी घ्यायची आहे.”
-
“मी होकार दिला आणि सिद्धीविनायक मंदिर न्यासाचा अध्यक्ष झालो.”
-
“माझ्या राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील कारकिर्दीमागे त्याचे आशीर्वाद आहेत.”
-
“मी जे प्रामाणिकपणे काम करतोय ही त्याचीच शिकवण आहे”, असे आदेश बांदेकरांनी यावेळी म्हटले.
“मला उद्धव ठाकरेंनी…” आदेश बांदेकरांनी सांगितला सिद्धीविनायक मंदिराच्या अध्यक्षपदाचा ‘तो’ किस्सा
नुकतंच एका मुलाखतीत आदेश बांदेकरांनी याबद्दल सांगितले होते.
Web Title: Aadesh bandekar share story how he was selected as a chairman in siddhivinayak temple know details nrp