Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress rakhi sawant arrested in sherlyn chopra case know the reason photos kak

Photos: अभिनेत्रीचा ‘तो’ एक व्हिडीओ आणि राखी सावंतला अटक, नेमकं प्रकरण काय?

राखी सावंतला अटक का झाली? नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Updated: January 19, 2023 14:45 IST
Follow Us
  • rakhi sawant arrested
    1/15

    अभिनेत्री राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल शर्लिन चोप्राने राखी विरोधात गेल्या वर्षी पोलिसांत तक्रार केली होती.

  • 2/15

    यासंदर्भात पोलिसांनी राखीला अटक केली आहे. आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली. शर्लिन चोप्रानेच ट्वीटरवरुन ही माहिती दिली आहे.

  • 3/15

    काल राखीने यासंदर्भात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला, अशी माहिती शर्लीनने ट्वीटमध्ये दिली आहे.

  • 4/15

    पण राखी सावंतला नेमकी कशामुळे अटक झाली? शर्लिन चोप्राने राखी विरोधात तक्रार केल्याचं नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊया.

  • 5/15

    ‘टाइम्स नाऊ’ला मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राखीने गेल्या वर्षी एक पत्रकार परिषदेत शर्लिन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवला होता.

  • 6/15

    शर्लिनच्या व्हिडीओवर राखीने अश्लील भाषेत टीकाही केली होती. त्याविरोधात शर्लिनने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

  • 7/15

    त्यानंतर राखीने “शर्लिनने तिच्या युट्यूब व इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ६ नोव्हेंबर २०२२ला एक व्हिडीओ अपलोड केला होता. त्यात तिने माझ्याबाबत अश्लाघ्य भाषेत टीका केली होती”, असं पोलिसांना सांगतिलं होतं.

  • 8/15

    राखीने मीडियासमोरही याबाबत प्रतिक्रिया दिली होती. “शर्लिनने केलेल्या टीकेमुळे माझा बॉयफ्रेंड माझ्यावर संशय घेत आहे. तुझे खरंच १० बॉयफ्रेंड होते का? असं तो मला विचारत आहे”, असं ती म्हणाली होती

  • 9/15

    पुढे तिने “तिच्यामुळे माझ्या आयुष्यात उलथापालथ होत आहे. तिने माझ्याविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे मला नाहक त्रास सहन करावा लागत आहे”, असंही म्हटलं होतं.

  • 10/15

    आता राखीला शर्लिनने केलेल्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली आहे.

  • 11/15

    राखी गेल्या अनेक दिवसांपासून आदिल खानबरोबरच्या लग्नामुळे चर्चेत होती. राखीने सात महिन्यांपूर्वीच आदिल खानसह कोर्ट मॅरेज व निकाह करत लग्नगाठ बांधली आहे.

  • 12/15

    दरम्यान, राखी सध्या अडचणीत आहे. राखीची आई गंभीर आजाराचा सामना करत आहे. कॅन्सरग्रस्त असलेल्या राखीच्या आईवर उपचार सुरू आहेत.

  • 13/15

    त्यात आता राखीला अटक झाल्यामुळे तिच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

  • 14/15

    (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम, इंडियन एक्सप्रेस)

  • 15/15

    (हेही पाहा>>रितेश देशमुख-जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट पाहा फक्त ९९ रुपयांत, कधी आणि कुठे? जाणून घ्या)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsराखी सावंतRakhi Sawant

Web Title: Actress rakhi sawant arrested in sherlyn chopra case know the reason photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.