Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ashwini kalsekar was working as air hostess before becoming an actress avn

खलनायिकेच्या भूमिकांमुळे लोकप्रिय झालेली अश्विनी काळसेकर करायची एअर होस्टेस म्हणून काम; जाणून घ्या तिच्या प्रवासाबद्दल

खलनायिका ते विनोदी भूमिका अगदी लीलया पेलणाऱ्या अश्विनीचा एक मोठा चाहतावर्ग आहे

January 22, 2023 11:48 IST
Follow Us
  • Ashwini-Kalsekar 1
    1/12

    काही कलाकार हे टेलिव्हिजन आणि रुपेरी पडद्यावर अगदी सहज वावरतात आणि दोन्ही माध्यमातील प्रेक्षकांना त्यांचं काम प्रचंड आवडतं.

  • 2/12

    या काही कलाकारांमधील एक महत्त्वाचं नाव म्हणजे अभिनेत्री अश्विनी काळसेकर.

  • 3/12

    खलनायिका ते विनोदी भूमिका अगदी लीलया पेलणाऱ्या अश्विनीचा एक मोठा चाहतावर्ग आहे.

  • 4/12

    ‘गोलमाल’, ‘खाकी’, ‘रक्तचरित्र’पासून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सर्कस’पर्यंत तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतात.

  • 5/12

    २००६ ते २००९ या दरम्यान अश्विनीने रंगवलेली ‘कसम से’ या मालिकेत ‘जिज्ञासा वालिया’ खलनायकी भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.

  • 6/12

    याप्रमाणेच ‘सीआयडी’मधील अश्विनीची कामाचीही खूप प्रशंसा झाली.

  • 7/12

    २२ जानेवारी १९७० रोजी मुंबईत जन्मलेल्या अश्विनीने शिक्षण पूर्ण झाल्यावर एका एअरलाईन्स कंपनीत नोकरी केली. ती केबिन क्रू मेंबर म्हणून काम करत होती.

  • 8/12

    शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी अश्विनी काही ठिकाणी ऑडिशन्सला जायची, आणि अशा रीतीने तिला कबीर भाटिया यांची मंदीरा बेदीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शांती’ या मालिकेत काम मिळालं.

  • 9/12

    अश्विनीला सर्वात मोठा ब्रेक देणारी मालिका म्हणजे ‘कसम से’. यातील तिची जिज्ञासा वालिया ही भूमिका लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली.

  • 10/12

    जिज्ञासाचा लुक खूप गाजला. डार्क काजळ, मोठी टिकली, आणि नाकातील मोठी नोज पिन ही तिची सिग्नेचर स्टाईल ठरली.

  • 11/12

    अश्विनीने रामगोपाल वर्मा, एकता कपूर, रोहित शेट्टी, श्रीराम राघवन यांच्यासारख्या दिग्गज लोकांबरोबर काम केलं आहे.

  • 12/12

    आज अश्विनी तिचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. (फोटो : अश्विनी काळसेकर / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ashwini kalsekar was working as air hostess before becoming an actress avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.