-
अभिनेत्री जिनिलीया देशमुख ही गेली अनेक वर्ष मनोरंजन सृष्टीपासून दूर होती.
-
तर ‘वेड’ या चित्रपटातून तिने मनोरंजसृष्टीत जवळपास १० वर्षांनी पुनरागमन केलं. या चित्रपटातून तिने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं आहे.
-
या चित्रपटाला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देत आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केला.
-
या चित्रपटात तिने श्रावणी ही व्यक्तिरेखा साकारली. या तिच्या व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम होतं, किंबहुना आजही करत आहेत.
-
परंतु या चित्रपटात काम करण्यापूर्वी जिनिलीयाला दडपण आलं होतं असा खुलासा तिने एका मुलाखतीत केला.
-
तिच्या पुनरागमनाबाबत तिच्या मनात अनेक शंका होत्या. प्रेक्षक तिला पुन्हा स्क्रिनवर पाहू इच्छित आहेत की नाही असे अनेक प्रश्न तिला पडले होते.
-
या सर्व प्रश्नांमुळे तिला तिच्या पुनरागमन करताना दडपण आलं होतं.
-
पण कमबॅक आधीच्या मधल्या काळात आपण कशा प्रकारच्या भूमिका साकारायला हव्या हेही तिला कळलं असल्याचं तिने सांगितलं.
‘वेड’ ठरला सुपरहिट पण पुनरागमन करताना जिनिलीयाला आलं होतं दडपण, म्हणाली…
‘वेड’ या चित्रपटातून तिने मनोरंजनसृष्टीत जवळपास १० वर्षांनी पुनरागमन केलं.
Web Title: Genelia deshmukh was tensed about her comeback rnv