-
बिगबॉस १६ हे पर्व खूपच गाजलं. या पर्वाच्या अखेरीस प्रियंका चहर चौधरी आणि मराठमोळा शिव ठाकरे यांच्यापैकी कोणी एक विजेता होईल असे सगळ्यांना वाटत असतानाच आपल्या फॅनफॉलोविंगच्या जोरावर एमसी स्टॅनने या पर्वाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
-
बिग बॉस १६ जिंकल्यानंतर आता एमसी स्टॅनची लोकप्रियता आणखीनच वाढली आहे. सलमान खानचा हा लोकप्रिय शो जिंकून एमसी स्टॅनने ३१ लाख रुपये आणि Hyundai i10 nios कार जिंकली.
-
बिगबॉस १६मुळे एमसी स्टॅन हे नाव घराघरात पोहोचलं. मात्र हे त्याचे खरे नाव नाही. पुण्याचा रहिवासी असलेल्या एमसी स्टॅनचं खरं नाव अल्ताफ शेख आहे. मग त्याने आपलं नाव बदलून एमसी स्टॅन का ठेवलं?
-
आज आपण, अल्ताफ शेखने आपलं नाव बदलून ‘एमसी स्टॅन’ असं का ठेवलं हे जाणून घेणार आहोत. पण त्या आधी एमसी स्टॅनबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.
-
बिगबॉस १६मुळे एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. पण ‘बिग बॉस’मध्ये येण्यापूर्वी एमसी स्टॅन अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला.
-
पुण्यामधील एका वस्तीमधून आलेला २३ वर्षीय रॅपर आपल्या सुरुवातीच्या काळात रिक्षामध्ये झोपायचा. मात्र आता त्याच्याकडे लाखो रुपयांच्या गाड्या आहेत.
-
एमसी स्टॅनच्या गळ्यातील चैनींची किंमत जवळपास दीड कोटीच्या घरात आहे, तर त्याने बिगबॉस १६च्या प्रीमियरला घातलेल्या शूजची किंमत ८० हजार इतकी होती.
-
एमसी स्टॅनचे युट्यूबवर तीन मिलियन फॉलोवर्स तर इन्स्टाग्राम ८ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. एमसी स्टॅन लहानपणापासूनच हुशार होता आणि त्याने आठवीला असताना पहिला रॅप लिहिला होता.
-
एमसी स्टॅन फक्त रॅप करत नाही. त्याला ब्रेक डान्सिंग आणि बीट बॉक्सिंगही अवगत आहे. त्याच्या रॅप्सचे बोलही तो स्वतः लिहितो.
-
एमसी स्टेनच्या मोठ्या भावाने त्याला संगीताशी ओळख करून दिली आणि त्यामुळेच त्याने लहानपणापासूनच त्यांच्या कल्पकतेवर काम करायला सुरुवात केली.
-
एमसी स्टॅनने वयाच्या १२व्या वर्षापासून कव्वाली गाण्यास सुरुवात केली. तो दिग्गज रॅपर एमिनेमचा चाहता आहे. एमिनेमची गाणी समजून घेण्यासाठी तो इंग्रजीही शिकला.
-
एमिनेमचा ‘स्टॅन्स’ नावाने ओळखला जाणारा एक चाहता वर्ग आहे. येथूनच अल्ताफला त्याचे नाव सापडले आणि त्याने स्वतःचे नाव ‘एमसी स्टॅन’ ठेवले.
Bigg Boss 16 Winner: ‘या’ कारणांमुळे अल्ताफ शेखने निवडलं ‘MC Stan’ हे नाव; जाणून घ्या नावामागची रंजक गोष्ट
आज आपण, अल्ताफ शेखने आपलं नाव बदलून एमसी स्टॅन असं का ठेवलं हे जाणून घेणार आहोत.
Web Title: Bigg boss 16 winner altaf sheikh chose the name mc stan for this reason know the interesting story behind the name pvp