-
भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या केली आहे.
-
आकांक्षाने वाराणसीमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये रविवारी(२६ मार्च) गळफास घेत जीवन संपवलं.
-
आकांक्षाच्या आत्महत्येनंतर तिच्या कथित बॉयफ्रेंडने पोस्ट शेअर करत श्रद्धांजली व्यक्त केली आहे.
-
‘निशब्द आकांशा दुबेच्या आत्म्यास शांती लाभो’ अशा शब्दात त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.
-
आकांक्षाचा कथित बॉयफ्रेंड समर सिंह हा भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता व गायक आहे.
-
चाहत्यांनाही या दोघांची जोडी खूप आवडली. मात्र आता अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर समर सिंहबद्दल सातत्याने चर्चा होत आहे.आकांक्षाने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी समरबरोबरचा फोटो शेअर केला होता त्यामुळे चर्चांना उधाण आले.
-
आकांक्षा दुबे रोज सोशल मीडियावर रील आणि फोटो शेअर करत असे. पण, तिने इन्स्टाग्रामवर भोजपुरी अभिनेता समर सिंहबरोबरचे अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत होते.
-
आकांक्षा मूळची मध्य प्रदेशातील मिर्जापूची रहिवाशी आहे. २१ ऑक्टोबर १९९७ साली तिचा जन्म झाला. तीन वर्षांची असताना ती स्वप्ननगरी मुंबईत आली होती.
-
आकांक्षा दुबेचा पवन सिंगबरोबरचा शेवटचा म्युझिक व्हिडिओ आजच प्रदर्शित झाला आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
Photos : आकांक्षा आत्महत्या करण्यापूर्वी समर सिंहला करत होती डेट; कोण आहे ‘हा’ तिचा कथित बॉयफ्रेंड?
इन्स्टाग्राम व टिकटॉकवर रील बनवून आकांक्षा प्रसिद्धीझोतात आली.
Web Title: Photos who is late bhjpuri actress akanksha dubeys boyfriend samar sigh spg