-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे काही विनोदी कलाकार बरेच चर्चेत आले.
-
या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
-
इतकंच नव्हे तर त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे वनिता खरात.
-
वनिताने नुकतंच ‘संपूर्ण स्वराज’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिचं राहणीमान आणि कुटुंबाविषयी भाष्य केलं.
-
ती चाळीमध्येच लहानाची मोठी झाली. वनिताचे आई-वडील अजूनही चाळीतच राहतात. सेलिब्रिटी म्हटलं की, लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.
-
पण मला अगदी साधंच राहायचं आहे असं वनिताचा म्हणणं आहे.
-
वनिता म्हणाली, “मी मध्यमवर्गीय आहे. सामान्य कुटुंबाधूनच मी इथवर पोहोचली. आपण टीव्हीवर दिसणाऱ्या लोकांना पाहून भारावून जाणारी लोकं आहोत”.
-
“टीव्हीवर दिसणाऱ्या लोकांचं कमाल लाइफस्टाइल असेल असं आपल्याला वाटतं. पण प्रत्येकाच्या बाबतीत असं घडतंच असं मला वाटत नाही”.
-
“पैसे, राहणीमान किंवा इतर बाबतीत हळूहळू एखादा व्यक्ती प्रगती करतो”.
-
“टीव्हीवर दिसणाऱ्या माणसांकडे खूप पैसे असतात असं लोकांना वाटतं. पण असंच असतं असं काही नाही. मी अजूनही चाळीत राहत होते”.
-
“लग्नानंतर मी दुसऱ्या ठिकाणी राहायला आली आहे. माझे आई-बाबा अजूनही चाळीत दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहतात”.
-
“जेव्हा मी बाईकवरुन फिरते तेव्हा लोकांना असं वाटतं की, काय ही बाईकने प्रवास करते. तुम्ही सेलिब्रिटी आहात तर गाडीने फिरलं पाहिजे. पण मला जसं आहे तसंच राहायला आवडतं. आपण साधी माणसं आहोत आणि मला तसंच राहायचं आहे”. (सर्व फोटो – फेसबुक)
“माझे आई-वडील अजूनही दहा बाय दहाच्या खोलीत राहतात पण…” वनिता खरातने सांगितली खरी परिस्थिती, म्हणाली, “जेव्हा मी…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने तिच्या कुटुंबियांबाबत तसेच राहणीमानाबाबत भाष्य केलं आहे. याचबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem vanita kharat talk about her lifestyle and family see details kmd