Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor akash thosar talk about sairat and ex girlfriend ghar banduk biryani kak

“‘सैराट’आधी माझ्याकडे एकही मुलगी बघत नव्हती” आकाश ठोसरचं वक्तव्य, म्हणाला “आता एक्स गर्लफ्रेंड…”

Ghar Banduk Biryani: आकाश ठोसरने केलेलं वक्तव्य चर्चेत

Updated: April 8, 2023 19:28 IST
Follow Us
  • akash thosar talk about sairat and ex girlfriend
    1/15

    ‘घर बंदूक बिरयानी’ हा मराठी चित्रपट ७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता आकाश ठोसरने हटके भूमिका साकारली आहे.

  • 2/15

    आकाशने ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. अशाच एका मुलाखतीत आकाशने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

  • 3/15

    ‘चिंगारी अॅप’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आकाशबरोबर एक खेळ खेळण्यात आला.

  • 4/15

    ‘नेव्हर आय हॅव एव्हर’ या गेममध्ये आकाशला काही प्रश्न विचारण्यात आले. आकाशने या गेममध्ये विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली.

  • 5/15

    “एक्सला टोमणे मारायचे म्हणून पोस्ट टाकली आहे का?” असा प्रश्न आकाशला विचारला गेला.

  • 6/15

    यावर उत्तर देत आकाश म्हणाला, “अजिबात नाही. एक्स अशीच बघून जळत असेल. त्यासाठी मला पोस्ट वगैरे टाकायची गरज नाही”.

  • 7/15

    त्यानंतर “क्रशवर छाप पाडण्यासाठी कधी ट्राय केलंस का?” असंही आकाशला विचारण्यात आलं.

  • 8/15

    “कधीच नाही. आपण जसं आहोत, तसं राहायचं. यावरच मुली फिदा होतील,” असं उत्तर आकाशने दिलं.

  • 9/15

    त्यानंतर आकाशला “मुलीने प्रपोज केल्यावर नकार दिलाय का?” असा प्रश्नही विचारण्यात आला.

  • 10/15

    “खरं सांगू का, सैराटआधी माझ्याकडे एकही मुलगी बघत नव्हती. पण आता मला सगळ्यांकडून खूप प्रेम मिळत आहे,” असं आकाश म्हणाला.

  • 11/15

    पुढे आकाश म्हणाला, “मुली परश्यावर, आकाशवर खूप प्रेम करतात. आणि तेवढंच प्रेम मी त्यांच्यावरही करतो.”

  • 12/15

    आकाशने मुलाखतीदरम्यान केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. ‘सैराट’मधून प्रसिद्धी मिळवलेला आकाश अनेक मुलींचा क्रश आहे.

  • 13/15

    ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटात आकाश ठोसरसह सायली पाटील, नागराज मंजुळे, सयाजी शिंदे हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.

  • 14/15

    (सर्व फोटो : आकाश ठोसर/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा>> Photos: भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र अन्…; अंकिता लोखंडेच्या मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष, फोटोंवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेतेMarathi Actorsमराठी चित्रपटMarathi Movie

Web Title: Marathi actor akash thosar talk about sairat and ex girlfriend ghar banduk biryani kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.