-
‘कलंक’ चित्रपटातील ‘घर मोरे परदेसिया’ या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.
-
यामध्ये पहिल्यांदाच लोकांनी आलिया भट्टला शास्त्रीय नृत्य करताना पाहिले.
-
या गाण्यात माधुरी दीक्षितही होती. या गाण्याचे बजेट ७ कोटी रुपये होते.
-
आमिर खान आणि कतरिना कैफच्या ‘धूम ३’ चित्रपटातील ‘मलंग’ गाणे चांगलेच गाजले
-
या गाण्याच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी सुमारे ५ कोटी रुपये खर्च केले आहेत.
-
गाण्यासाठी २०० हून अधिक व्यावसायिक जिम्नॅस्ट्सना सामील करण्यात आले होते.
-
ऐश्वर्या राय बच्चन आणि रजनीकांत यांच्या ‘रोबोट’ चित्रपटातील ‘किलीमांजारो’ हे गाणे पेरूमधील माचू पिचू येथे चित्रित करण्यात आले.
-
चित्रपटातील हे गाणे चित्रित करण्यासाठी निर्मात्यांना ४ कोटी रुपये खर्च करावे लागले.
-
हे गाणे प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध झाले.
-
२०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ चित्रपटातील ‘घूमर घूमर’ हे गाणे तयार करण्यात संजय लीला भन्साळी यांनी कोणतीही कसर सोडली नाही.
-
यासाठी भव्य सेटसोबतच दीपिका ते बॅकग्राउंड डान्सर्सशी संबंधित प्रत्येक खास गोष्टीचीही काळजी घेण्यात आली होती.
-
गाण्यांच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी सुमारे ४ कोटी रुपये खर्च केले आहेत.
-
अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा स्टारर ‘बॉस’ या चित्रपटातील ‘पार्टी ऑल नाईट’ या गाण्याचे बजेट ६ कोटी रुपये होते.
-
यो यो हनी सिंगने या गाण्यात रॅप केले आहे.
-
या गाण्यात ६०० परदेशी मॉडेल्सनी बॅकग्राउंड डान्सर म्हणून परफॉर्म केले.
-
शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या देवदास चित्रपटातील ‘डोला रे डोला’ गाणे चांगलेच गाजले.
-
चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या गाण्यासाठी भव्य सेट लावला होता.
-
चित्रपटाच्या कोरिओग्राफर सरोज खानच्या म्हणण्यानुसार, गाण्याच्या शूटिंगवर सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
-
शाहरुख खानचा चित्रपट ‘रावन’ मधील ‘छमक छल्लो’ हे गाणेही चांगलेच गाजले
-
हे गाणे हॉलिवूड गायक एकोनने गायले आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गाण्याचे बजेट ३ कोटी होते. (स्रोत: स्क्रीन शॉट)
‘ही’ आहेत बॉलिवूडमधील सगळ्यात महागडी गाणी; चित्रिकरणासाठी निर्मात्यांनी केले कोट्यवधी रुपये खर्च
भारतीय चित्रपटांमध्ये गाणी नसतील तर हे चित्रपट अपूर्ण वाटतात. केवळ बॉलीवूड चित्रपटांवरच नाही तर आता गाण्यांवरही खूप पैसा खर्च केला जात आहे. आज आम्ही त्या बॉलिवूड चित्रपटांच्या गाण्यांबद्दल सांगणार आहोत ज्यासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला.
Web Title: Most expensive songs of bollywood dola re dola malang ghoomar ghoomar chammak challo dola re dola dpj