-
दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन: 2’ हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तामिळ आणि हिंदीसह पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
-
‘पोन्नियिन सेल्वन: 2’ ची कथा महान चोल सम्राट राजा चोल यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागातही कथा या राजाभोवती फिरताना दिसली होती.
-
आता दुसऱ्या भागात ही कथा पुढे सरकताना दिसणार आहे. लायका प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
-
‘पोन्नियिन सेल्वन’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या दोन्ही चित्रपटांसाठी निर्मात्यांनी मोठी रक्कम मोजली आहे. प्रचंड खर्च करून हे चित्रपट बनवले गेले आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी निर्मात्यांनी २५० कोटी रुपये खर्च केले होते.
-
यापूर्वी हा चित्रपट फक्त एकाच भागात दाखवला जाणार होता. ज्यांचे बजेट ५०० कोटींपर्यंत जात होते. पण नंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे दोन भाग करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच हे दोन्ही भाग बनवण्यासाठी ५०० कोटी रुपये खर्च झाले आहेत.
-
‘पोन्नियिन सेल्वन 2’ मधील कुंदावईच्या भूमिकेसाठी त्रिशा कृष्णनला तीन कोटी रुपये देण्यात आले आहेत.
-
तर ऐश्वर्या लक्ष्मीला पूंगुझालीच्या भूमिकेसाठी दीड कोटी रुपये देण्यात आले आहेत. दोन्ही अभिनेत्रींचे काम प्रेक्षकांना खूप आवडले आहे.
-
मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’च्या दोन्ही भागांमध्ये ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटासाठी ऐश्वर्याने खूप मोठी रक्कम घेतली आहे.
-
ऐश्वर्याने चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी १० कोटी रुपये स्वीकारले. त्याचवेळी तिने चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी फी वाढवली. ऐश्वर्या रायने ‘पोन्नियिन सेल्वन 2’साठी १२ कोटी रुपये घेतले आहेत.
-
दाक्षिणात्य अभिनेता विक्रम, ज्याला चियान म्हणूनही ओळखले जाते, यानेही ‘पोन्नियिन सेल्वन 2’साठी ऐश्वर्या रायच्या बरोबरीचे मानधन घेतले आहे.
-
PS2 मध्ये पार्थिवेंद्र पैलवानची भूमिका साकारणाऱ्या विक्रमनेही तब्बल १२ कोटी रुपये घेतले आहेत.
-
सर्व फोटो : अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट
‘PS 2’मध्ये ऐश्वर्या रायचीच हवा! मानधनाच्या बाबतीत दाक्षिणात्य कलाकारांपेक्षाही ठरली वरचढ; जाणून घ्या रक्कम
‘पोन्नियिन सेल्वन’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या दोन्ही चित्रपटांसाठी निर्मात्यांनी मोठी रक्कम मोजली आहे.
Web Title: Ponniyin selvan 2 released aishwarya rai charged huge amount for ps 2 know her fees the total budget of film pvp