-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून पल्लवी पाटीलला ओळखले जाते.
-
‘रुंजी’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.
-
ती कायमच तिच्या मालिकांसह खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
-
पल्लवी पाटीलने नुकतंच प्लॅनेट मराठीवरील ‘त्या नंतर सगळं काही बदललं’ या कार्यक्रमात हजेरी लावली.
-
यावेळी तिने तिचे आई-वडील, तिचे बालपण, आयुष्यात आलेले अनेक उतार-चढाव, हिंदी सिनेसृष्टीतील काम याबद्दल भाष्य केले.
-
नुकतंच तिने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल आणि बोल्ड फोटो परिधान करण्याबद्दल प्रतिक्रिया दिली.
-
पल्लवी पाटीलने अभिनेता संग्राम समेळबरोबर २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली होती.
-
पण त्या दोघांचेही नातं फार काळ टिकलं नाही.
-
त्या दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
-
पल्लवीबरोबर घटस्फोट झाल्यानंतर संग्रामने दुसरे लग्न केले.
-
याचदरम्यान पल्लवीने एक बोल्ड फोटोशूट करत त्याचे फोटो शेअर केले होते.
-
यावरुन ती चर्चेत आली होती. आता तिने याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
-
“संग्राम दुसरं लग्न करतोय, हे मला त्याने सांगितलं होतं.”
-
“पण केव्हा करतोय याची मला अजिबात माहिती नव्हती.”
-
“मी माझ्या कुटुंबाबरोबर फिरायला गेले होते.”
-
“त्यावेळी मी शॉर्टस घालून फोटो टाकले होते.”
-
“ते फोटो टाकण्याची वेळ आणि संग्रामचं लग्न ही वेळ इतकी अचूक जुळून आली होती.”
-
“त्यावेळी मला ही किती चुकीची वेळ आहे, असे वाटलं.”
-
“मी त्यातला एक फोटो अगोदरच टाकला होता.”
-
“पण तेव्हा त्याकडे कोणाचेच लक्ष गेले नव्हते.”
-
“फक्त संग्रामचं लग्न होतं आणि माझे फोटो त्यामुळे लोकांना विषय मिळाला”, असे पल्लवी पाटील म्हणाली.
-
दरम्यान संग्राम समेळने श्रद्धा फाटकबरोबर लग्नगाठ बांधली.
-
ती एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे.
-
संग्राम आणि श्रद्धाचा हा विवाह सोहळा खास नातेवाईक आणि कुटुंबाच्या उपस्थितीत पार पडला होता.
“माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न अन् चर्चा मात्र बोल्ड फोटोशूटची”, पल्लवी पाटीलने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “ही वेळ…”
पूर्वाश्रमीच्या पतीच्या दुसऱ्या लग्नावेळी बोल्ड फोटो टाकण्याबद्दल पल्लवी पाटीलचे भाष्य
Web Title: Marathi actress pallavi patil talk about ex husband sangram samel and bold photoshoot nrp