• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sara ali khan visited kedarnath temple in uttarakhand sushant singh rajput shared photos on social media pvp

Photos: ‘भोलेनाथा’चं दर्शन घ्यायला सारा अली खान पोहोचली केदारनाथला; म्हणाली, “मी जे काही..”

साराने नुकतंच केदारनाथमधील फोटो शेअर केले आहेत. साराने या पोस्टमध्ये सुंदर संदेशही लिहिला आहे.

May 11, 2023 14:04 IST
Follow Us
  • sara-ali-khan-kedarnath
    1/10

    सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी मुलगी सारा अली खानने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावले आहे. सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

  • 2/10

    सारा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मनोरंजक पोस्ट शेअर करत असते. सारा पुन्हा एकदा तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

  • 3/10

    सारा अली खान अनेकदा कुठे ना कुठे फिरत असते. याचे फोटो ती तिच्या चाहत्यांसोबत शेअर करायला विसरत नाही. सध्या सारा केदारनाथमध्ये आहे.

  • 4/10

    यावेळी सारा गुलाबी रंगाच्या मास्कच्या मदतीने आपला चेहरा झाकलेली दिसली.

  • 5/10

    साराने नुकतंच केदारनाथमधील फोटो शेअर केले आहेत. साराने या पोस्टमध्ये सुंदर संदेशही लिहिला आहे. साराचे हे फोटो पाहून चाहत्यांना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आठवण आली आहे.

  • 6/10

    केदारनाथ हे तेच ठिकाण आहे जिथून साराने आपल्या चित्रपटाच्या करियरला सुरुवात केली होती. ‘केदारनाथ’ हा तिचा पहिला चित्रपट होता. यामध्ये ती सुशांत सिंग राजपूतबरोबर दिसली. चित्रपटातील बराचसा भाग तिथे शूट झाला होता.

  • 7/10

    साराने केदारनाथमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की ती महादेवाची आभारी आहे. २०१८ साली, साराने सुशांत सिंग राजपूतसोबत ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

  • 8/10

    साराने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी पहिल्यांदा या ठिकाणी आले तेव्हा मी कधीही कॅमेराचा सामना केला नव्हता. आज मी त्याच्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही. धन्यवाद केदारनाथ बाबा मी आज जे आहे ते तुमच्यामुळेच आहे.’

  • 9/10

    साराचे चाहते तिच्या पोस्टवर भरपूर कमेंट करत आहेत. यावेळी अनेकांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचीही आठवण काढली. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, ‘ही पोस्ट पाहिल्यानंतर सुशांतची आठवण आली’. दुसर्‍याने लिहिले ‘खरोखर मिस सुशांत सिंग राजपूत.’

  • 10/10

    लक्ष्मण उतेकरच्या पुढील चित्रपटात सारा विकी कौशलसोबत दिसणार आहे. यासोबतच ती ‘ए वतन मेरे वतन’ आणि होमी अदजानियाच्या ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटातही दिसणार आहे. (Photos: Instagram)

TOPICS
करोना विषाणूCoronavirusबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Sara ali khan visited kedarnath temple in uttarakhand sushant singh rajput shared photos on social media pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.