-
बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींचं नाव जेव्हा घेतलं जातं, तेव्हा माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते.
-
आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ‘धक धक गर्ल’ म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते.
-
माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे.
-
माधुरी दीक्षितने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.
-
एवढ्या सुपरहिट चित्रपटानंतरही माधुरीला आजही तिच्या एका चित्रपटाबद्दल पश्चाताप होतो. हा चित्रपट म्हणजे ‘दयावान’.
-
यात तिने बॉलिवूड अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबतचा स्क्रीन शेअर केली होती.
-
‘दयावान’ या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांनी अनेक रोमँटिक आणि किसिंग सीन दिले होते.
-
१९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील माधुरी आणि विनोद खन्ना यांच्या किसिंग सीनमुळे खळबळ उडाली होती.
-
माधुरीचा ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्याबरोबरचा तो सीन चर्चेचा विषय ठरला होता.
-
माधुरी दीक्षितनेही अनेकदा विनोद खन्नांबरोबरच्या त्या किसिंग सीनवर अनेकदा भाष्य केले आहे.
-
काही वर्षापूर्वी माधुरीने एक मुलाखत दिली होती.
-
या मुलाखतीत तिला या चित्रपटातील किसिंग सीनबद्दल विचारण्यात आले होते.
-
यावर तिने म्हटलेले, “जेव्हा मी याकडे मागे वळून पाहते, तेव्हा मला असं वाटतं की मी या सीन नाही म्हणायला हवं होतं.”
-
“त्यावेळी मी त्यांना मला हे करायचं नाही, असे सांगायला हवे होते.”
-
“पण तेव्हा कदाचित मला हे सांगायला भीती वाटली असावी.”
-
“त्यावेळी मला वाटले की मी एक अभिनेत्री आहे.”
-
“दिग्दर्शकाने लिहिलेल्या गोष्टी नाकारणे, हे या चित्रपटासाठी चुकीचे ठरेल.”
-
“माझ्या कुटुंबातील कोणीही सिनेसृष्टीतील नाही.”
-
“त्यामुळे मला या ठिकाणी कसे काम चालते, याची माहिती नव्हती.”
-
“त्यामुळे एखादा किसिंग सीन नाकारताना काय बोलायचे याची मला काहीही माहिती नव्हती.”
-
“म्हणून मी हा सीन केला.”
-
“त्यानंतर जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा मला असा प्रश्न पडला होता की मी हे का केले?”
-
“या किसिंग सीनमुळे चित्रपटात विशेष काही घडले नाही.”
-
“यानंतर मात्र मी ठरवले की आता यापुढे मी किसिंग सीन कधीच करणार नाही”, असे स्पष्टीकरण माधुरीने दिले होते.
-
लग्नानंतर माधुरी दीक्षितने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता.
-
या ब्रेकनंतर परतल्यानंतर तिने ‘आजा नचले’, ‘देढ इश्किया’, ‘गुलाब गँग’, ‘बकेट लिस्ट’, ‘टोटल धमाल’ आणि ‘कलंक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
“मी नाही म्हणायला हवं होतं पण…” माधुरी दीक्षितने विनोद खन्नांबरोबरच्या ‘त्या’ किसिंग सीनबद्दल केलेला खुलासा, म्हणालेली “यानंतर मात्र…”
विनोद खन्नांबरोबरच्या ‘त्या’ किसिंग सीनचा माधुरी दीक्षितला आजही होतो पश्चात्ताप
Web Title: Actress madhuri dixit talk about dayavan movie kissing scean with vinod khanna said why did i do it nrp