-
पूजा हेगडे ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आघाडीची अभिनेत्री आहे. अभिनयाचा ठसा उमटवत पूजाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केली.
-
सध्या पूजा बॉलिवूडमध्येही नशीब आजमावून बघत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सर्कस’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ यासारख्या बड्या चित्रपटात पूजाने काम केलं आहे.
-
पूजा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. खासगी आयुष्यातील घडामोडी ती शेअर करत असते. याबरोबरच पूजा तिचे बोल्ड, ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर करण्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे. तिचे हे बोल्ड लूक्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात.
-
नुकतंच पूजाने लाल रंगाच्या स्लीट ड्रेसमधील काही फोटोज शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनदेखील अगदी हटके दिलं आहे. तिने लिहिलं की, “काडेपेटीतील काडी कुठे आहे, कारण लवकरच मी आग लावणार आहे.”
-
पूजाच्या या बोल्ड आणि हॉट फोटोजनी सोशल मीडियावर एकाअर्थी खरंच आग लावलेली आहे.
-
या ड्रेसमधील पूजाचा हा बोल्ड आणि मादक अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
-
या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट करत पूजाच्या या हॉटनेसची प्रशंसा केली आहे. इतकंच नाही तर तिच्याएवढी बोल्ड आणि हॉट अभिनेत्री सध्या कुणीच नाही असंही तिचे चाहते म्हणताना दिसत आहेत.
-
पूजा हेगडेचा हा लूक लोकांना पसंत पडला असून सोशल मीडियावर तिच्या या बोल्ड लूकची जबरदस्त चर्चा आहे. (फोटो सौजन्य : पूजा हेगडे / इंस्टाग्राम)
लाल स्लीट ड्रेसमध्ये पूजा हेगडेचा जबरदस्त हॉट लूक व्हायरल; बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ, कॉमेंट करत म्हणाले…
सध्या पूजा बॉलिवूडमध्येही नशीब आजमावून बघत आहे
Web Title: Pooja hegde hot and bold look in red slit dress viral on social media avn