-
शुबमन गिलने आपले शतक पूर्ण करत रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला आयपीएल २०२३मधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. शुभमनने १०४ धावांची दमदार खेळी करत विराट कोहलीची शतकी खेळी धुळीस मिळवली.
-
प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी आरसीबीला हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक होते, परंतु शुबमन गिलने गुजरात टायटन्ससाठी सलग दुसरे शतक झळकावून कोहली आणि त्याच्या चाहत्यांचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच ठेवले.
-
गिलच्या या खेळीनंतर मात्र आरसीबीच्या चाहत्यांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. सर्व मर्यादा ओलांडत त्याने सोशल मीडियावर शुभमन गिलच्या बहिणीबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलण्यास सुरुवात केली.
-
या सामन्यानंतर शुबमन गिलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्याची बहीण शाहलीननेही या पोस्टवर कमेंट केली. त्यानंतर ती आरसीबीच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आली.
-
आरसीबीच्या या पराभवानंतर आरसीबीचे चाहते शाहलीनच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करत तिला ट्रोल करत आहेत. शाहनील 22 एप्रिल रोजी ती तिचा भाऊ शुबमन गिलचा सामना पाहण्यासाठी लखनऊच्या एकना स्टेडियमवर पोहोचली होती. यावेळचे काही फोटो तिने इन्स्टावर शेअर केले होते.
-
शाहनीलच्या या पोस्टवर आरसीबीच्या चाहत्यांनी अत्यंत असभ्य कमेंट करत त्यांच्या कुटुंबीयांनाही आक्षेपार्ह गोष्टी म्हटल्या आहेत. यादरम्यान अनेकांनी शुभमनला धमक्याही दिल्या आहेत.
-
मात्र, शाहनीलला सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना अनेकांनी फटकारले आहे. त्यांचे असे म्हणणे होते की अशा प्रकारची मानसिकता असलेले लोक आरसीबीचे चाहते असूच शकत नाहीत. त्यांच्या मनात फक्त घाण असते.
-
आरसीबीच्या पराभवावर विराटचे चाहते शुबमनला ट्रोल करत असले तरी सामना संपल्यानंतर विराटने शुबमनला मिठी मारली आणि शुबमनच्या शतकी खेळीचे कौतुक केले.
-
या सामन्यानंतर दोघांचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, यामध्ये कोहली गिलला मिठी मारताना दिसत होता. (Instagram)
RCB आणि GT चा सामना, पण ट्रोल झाली शुबमन गिलची बहीण; जाणून घ्या वादाचं नेमकं कारण काय?
शुभमन गिलने गुजरात टायटन्ससाठी सलग दुसरे शतक झळकावून कोहली आणि त्याच्या चाहत्यांचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच ठेवले.
Web Title: Rcb and gt match but shubman gill sister shahneel gets trolled know what is the real reason for the dispute pvp