-
काही दिवसांपूर्वीच प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला आणि त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं.
-
मुग्धा आणि प्रथमेशने त्यांच्या प्रेमाचा खुलासा केल्यावर अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
-
त्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्याचबरोबर मनोरंजन सृष्टीतील दिग्गज कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
-
गेली साडेतीन ते चार वर्ष ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत. आतापर्यंत मुग्धा आणि प्रथमेश अनेकदा एकत्र दिसून आले. तसंच त्यांनी अनेक गाण्याचे कार्यक्रमही एकत्र केले आहेत.
-
आता ते दोघं लग्न कधी करणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. चाहते याबद्दल सतत त्यांना प्रश्न विचारात होते.
-
अखेर प्रथमेश आणि मुग्धाने ते लग्न कधी करणार याचं उत्तर दिलं आहे.
-
एका व्हिडीओच्या माध्यमातून त्या दोघांनी सांगितलं, “लग्न कधी करायचं हे आमचं अजून काही ठरलेलं नाही.”
-
“सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठरलय पण तुम्हाला सांगायचं नाही असा आमचा हेतू अजिबात नाहीये. कारण तुम्ही आमच्या आनंदात एवढे सहभागी झाला आहात की हा आमचा आनंद तुमच्या शेअर करायलाही आम्हाला तितकंच आवडणार आहे.”
-
“त्यामुळे आमचं लग्नाबद्दल अजून काही ठरलेलं नाहीये ठरलं की आम्ही लगेच तुम्हाला सांगू.”
-
“आम्ही आमचे रिलेशन जाहीर केल्यावर तुम्ही आम्हाला इतका चांगला प्रतिसाद दिला आहे, तो पाहून आम्ही खरोखर भारावून गेलो आहोत. त्यामुळे लग्नाबद्दल आमचं काहीही ठरलं की आम्ही लगेच तुम्हाला सांगू.”
-
मुग्धा २३ वर्षांची आहे आणि ती इतक्या लवकर का लग्न करत आहे? असा प्रश्नही अनेकांना पडला होता. याचं उत्तरही त्यांनी दिलं.
-
मुग्धा आणि प्रथमेशच्या वयामध्ये चार ते पाच वर्षांचं अंतर आहे आणि प्रथमेशला त्याच्या तीशीमध्ये लग्न करायचं नाही. त्याला त्याच्या आधी लग्न करायचं आहे.
-
याचबरोबर मुलीने लग्न करण्यासाठी २३ हे पूर्वापार चालत आलेलं योग्य वय आहे, असं प्रथमेशला वाटतं.
-
त्यांना आयुष्यात अजून खूप काही मिळवायचं आहे. पण करिअरच्या या टप्प्यावर आल्यावर ते दोघं एकमेकांशी लग्न करण्यासाठी सक्षम आहेत असं त्यांना वाटतं, असाही खुलासा त्यांनी केला.
-
पण ते यावर्षी लग्न करणार की पुढच्या वर्षी हे अजून त्यांनी ठरवलेलं नाही.
“लग्न कधी करणार?” अखेर मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेने केला खुलासा, म्हणाले…
मुग्धा २३ वर्षांची आहे आणि ती इतक्या लवकर का लग्न करत आहे? असा प्रश्नही अनेकांना पडला होता. याचं उत्तरही त्यांनी दिलं.
Web Title: Prathamesh laghate and mugdha vaidhampayan reveals when they are getting married rnv