-
झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरात लोकप्रिय झालेले कलाकार म्हणजे मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे.
-
काही दिवसांपूर्वीच मुग्धा आणि प्रथमेश यांनी एकमेकांना डेट करत असल्याची कबुली दिली.
-
मुग्धा आणि प्रथमेश यांच्या नात्यांबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
कलाविश्वाप्रमाणेच ही जोडी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
नुकतेच मुग्धाने एका कार्यक्रमाच्या शूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मुग्धा आणि प्रथमेश यांनी ट्विनिंग केले आहे.
-
मुग्धा-प्रथमेशच्या कपड्यांवर विठ्ठल व रखुमाईची सुंदर प्रतिमा आहे.
-
ही लोकप्रिय जोडी लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
-
दरम्यान मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी संगीत क्षेत्रात त्यांची स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
-
पंधरा वर्षांपूर्वी झालेली त्या दोघांची मैत्री आजही कायम आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे / इन्स्टाग्राम)
Photos: मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेचं Twinning; कपड्यांवरील विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिमेने वेधले लक्ष
काही दिवसांपूर्वीच मुग्धा आणि प्रथमेश यांनी एकमेकांना डेट करत असल्याची कबुली दिली.
Web Title: Marathi singer couple mugdha bhagawan prathamesh laghate twinning vitthal rakhumai design on clothes photos sdn