-
बाईपण भारी देवा मधून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर मराठी चित्रपटांची ताकद सिद्ध झाली आहे.
-
बाईपण भारी देवा सिनेमाच्या यशाचे श्रेय सर्व अभिनेत्रींच्या बारकाईने साकारलेल्या पात्रांना जाते असे म्हणायला हवे.
-
कोट्यवधींची कमाई करणारा बाईपण भारी देवा आता वेड चित्रपटाचे रेकॉर्ड सुद्धा मोडत आहे
-
फक्त अभिनयच नव्हे तर त्यांच्या कपड्यांमधून सुद्धा विशेष महत्त्वाचे अर्थ अधोरेखित करण्यात आले आहेत. वेशभूषाकार युगेशा ओमकार हिने इंस्टाग्राम अकाउंटवर प्रत्येक पात्राच्या कपड्यांविषयी माहिती दिली आहे
-
युगेशाने दीपा परब- चौधरी म्हणेजच चारुच्या पात्रासाठी वापरलेल्या कुर्तींविषयी खास माहिती दिली आहे.
-
ती म्हणते की, चारू हे पात्र खूपच बंदिस्त आहे, ती कधीच कोणासमोर मोकळी होत नाही म्हणूनच बहुतांश कपडे हे बंद गळ्याचे आहेत.
-
शिवाय चारू ही आर्थिक दृष्टीने सक्षम आहे, ती नवऱ्यालाही सांभाळतेय म्हणजेच ती ‘मॅन ऑफ द हाऊस’ आहे. म्हणूनच तिला कॉलरचे कुर्ते देण्यावर भर दिला आहे.
-
चारू या पात्रावर अगोदरच इतक्या प्रकारच्या जबाबदाऱ्या होत्या की वेगळी एक ओढणी किंवा स्कार्फ सांभाळायला तिला परत कष्ट घेण्यासाठी वेळ नाही.
-
म्हणूनच दीपाला म्हणजेच चारूला मोजकेच दोन ब्रेसलेट आणि साधी ज्वेलरी देण्यात आली होती
‘बाईपण भारी देवा’ची ‘चारु’ म्हणजेच दीपाच्या सर्व कुर्तींमधून ‘हा’ संदेश ठळकपणे दिला होता, तुमच्या लक्षात आला का?
Baipan Bhari Deva: दीपा परब- चौधरी म्हणेजच चारुच्या पात्रासाठी वापरलेल्या कुर्तींविषयी खास माहिती दिली आहे. यातील प्रत्येक कुर्ता हा असा बनवला होता की…
Web Title: Baipan bhari deva charu kurti set gave these big message very loudly ankush choudhary wife deepa parab instagram video svs