• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. edelweiss arc company statement on nitin desai death loan nclt insolvency proceedings hrc

७ वर्षांपूर्वीचे कर्ज, थकलेले हप्ते, NCLT चे ‘ते’ आदेश अन् नितीन देसाईंची आत्महत्या; एडलवाईस एआरसी कंपनीच्या निवेदनात काय म्हटलंय?

Nitin Desai Suicide ; नितीन देसाईंच्या निधनानंतर एडलवाईस एआरसी कंपनीने प्रसिद्ध केलं पत्रक

August 4, 2023 13:03 IST
Follow Us
  • Edelweiss Arc Issues Statement On nitin desai
    1/15

    सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली.

  • 2/15

    त्यांच्यावर तब्बल अडीचशे कोटींचं कर्ज होतं, त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते, अशी माहिती समोर आली.

  • 3/15

    यासंदर्भात एडलवाईस एआरसी कंपनीने एक पत्रक प्रसिद्ध करून नितीन देसाईंच्या कंपनीवर असलेल्या कर्जाचे तपशील उघड केले आहेत.

  • 4/15

    एडलवाईस एआरसीने गुरुवारी नितीन देसाई यांची कंपनी एनडीज आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध दिवाळखोरीच्या कारवाईसंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. 

  • 5/15

    “नितीन देसाई यांच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे आणि या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून शोक व्यक्त करतो,” असं कंपनीने म्हटलं आहे. 

  • 6/15

    ‘इकोनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, देसाई यांच्या कंपनीवर एकूण २५२ कोटी रुपयांची थकबाकी होती, असंही कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे. 

  • 7/15

    याबाबत एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाने २५ जुलै २०२३ रोजी नितीन देसाई यांची कंपनी ND’s Art World Private Limited विरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते. 

  • 8/15

     आदेशात खंडपीठाने दिवाळखोरीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जितेंद्र कोठारी यांची अंतरिम रिझोल्यूशन प्रोफेशन म्हणून नियुक्ती केली होती.

  • 9/15

    एनसीएलटीच्या आदेशाविरुद्ध नितीन देसाईंच्या कंपनीने एनसीएलएटीच्या नवी दिल्लीतील खंडपीठामध्ये अपील केले होते. पण ते अपील १ ऑगस्ट २०२३ रोजी फेटाळून लावण्यात आले, असंही पत्रकात म्हटलं आहे.

  • 10/15

    नोव्हेंबर २०१६ मध्ये नितीन देसाई यांच्या कंपनीने १५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. 

  • 11/15

    त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये ईसीएल फायनान्सकडून पुन्हा अतिरिक्त ३५ कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले. 

  • 12/15

     जानेवारी २०२० पासून कर्जाचे हप्ते थकू लागले. त्यांच्या कंपनीवर एकूण २५२ कोटी रुपयांची थकबाकी होती. 

  • 13/15

     त्यासाठी जुलै २०२२ मध्ये एनसीएलटीकडे याचिका करण्यात आली होती, असंही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

  • 14/15

    “याप्रकरणी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करू तसेच कायदेशीर प्रक्रियेचे पालन करू” असेही कंपनीने निवेदनात म्हटले आहे.

  • 15/15

    दरम्यान, १ ऑगस्ट रोजी याचिका फेटाळली गेली आणि २ ऑगस्ट रोजी नितीन देसाई यांच्या मृत्यूची बातमी आली.(सर्व फोटो – संग्रहित)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Edelweiss arc company statement on nitin desai death loan nclt insolvency proceedings hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.