• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. art director nitin desai suicide case daughter manasi desai first reaction rmm

“माझ्या बाबांनी पवईतील ऑफिस विकून…”, नितीन देसाईंची मुलगी मानसीने सांगितला घटनाक्रम

प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर मुलगी मानसी देसाई हिने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

August 5, 2023 23:50 IST
Follow Us
  • बॉलीवूडमधील ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. ते कर्जामुळे आर्थिक अडचणीत होते आणि त्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती.
    1/15

    बॉलीवूडमधील ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. ते कर्जामुळे आर्थिक अडचणीत होते आणि त्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती.

  • 2/15

    या संपूर्ण प्रकरणावर पहिल्यांदाच नितीन देसाई यांची मुलगी मानसीने कुटुंबियांची बाजू मांडली आहे. तिने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

  • 3/15

    माझ्या वडिलांवर १८१ कोटी रुपयांचं कर्ज होतं. माझ्या वडिलांचा कधीच, कुणालाही फसवण्याचा हेतू नव्हता. माझ्या बाबांनी खूप मेहनत करून नाव कमावलं होतं- मानसी देसाई

  • 4/15

    मी मानसी चंद्रकांत देसाई, ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची मोठी मुलगी. मी माझी आई आणि कुटुंबातर्फे हे स्टेटमेंट देत आहे की माझे बाबा नितीन चंद्रकांत देसाई आम्हाला २ ऑगस्ट २०२३ रोजी सोडून गेले- मानसी देसाई

  • 5/15

    त्यानंतर माध्यमांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. हे स्टेटमेंट देण्याचा हाच हेतू आहे की ही दुःखद घटना घडल्यानंतर त्यांच्याबद्दल कर्ज बुडवण्याच्या बातम्या येत आहेत- मानसी देसाई

  • 6/15

    आम्ही बाबांची बाजू आणि त्यांच्याबरोबर जे घडलं तेच माध्यमांना सांगायचा प्रयत्न करत आहोत- मानसी देसाई

  • 7/15

    माझ्या वडिलांवर १८१ कोटी रुपयांचं कर्ज होतं, त्यापैकी ८६.३ कोटी रुपयांची परतफेड आम्ही फेब्रुवारी २०२० पर्यंत केली होती. नंतर करोना आल्याने पूर्ण जग थांबलं, बॉलीवूडलाही त्याचा फटका बसला – मानसी देसाई

  • 8/15

    बाबाकडे काम नव्हतं म्हणून स्टुडिओ बंद करावा लागला, त्यामुळे पेमेंट्स देण्यात उशीर झाला, नियमित होऊ शकले नाहीत- मानसी देसाई

  • 9/15

    त्याआधी लोन देणाऱ्या कंपनीने आमच्याकडून सहा महिन्यांचे अॅडव्हान्स पेमेंट मागितले होते- मानसी देसाई

  • 10/15

    त्यावेळी माझ्या बाबांनी पवईतील ऑफिस विकून त्यांची मागणी पूर्ण केली होती. त्यानंतरही कुणालाच फसवायचा बाबांचा हेतू नव्हता- मानसी देसाई

  • 11/15

    त्यांनी गेली दोन वर्षे लोन देणाऱ्या कंपनीबरोबर मीटिंग्स करून लोन सेटलमेंट करण्यासाठी किंवा रिस्ट्रक्चर करण्यासाठी खूप प्रयत्न केले, जेणेकरून ते कर्ज फेडू शकतील- मानसी देसाई

  • 12/15

    कंपनीने त्यांना आश्वासनं दिली की आपण सगळं हँडल करू आणि ते कर्ज फेडण्यात त्यांची मदत करतील. पण दुसरीकडे त्यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली- मानसी देसाई

  • 13/15

    गुंतवणूकदार बाबांची मदत करायला तयार होते. पण कंपनीने त्यांना मदत करू दिली नाही- मानसी देसाई

  • 14/15

    माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की बाबांबद्दल कोणत्याही खोट्या बातम्या किंवा चुकीच्या बातम्या पसरवल्या जाऊ नये. माझ्या वडिलांनी खूप मेहनत करून नाव कमावलं होतं, ते मातीत मिसळू नका – मानसी देसाई

  • 15/15

    यावेळी तिने राज्य सरकारला या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली. तसेच तिच्या वडिलांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे त्यांचा स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.

TOPICS
आत्महत्याSuicideमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Art director nitin desai suicide case daughter manasi desai first reaction rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.