Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. director digpal lanjekar shivraj ashtak fifth subhedar tanaji malusare movie cast in marathi ajay purkar photos sdn

Photo: बहुचर्चित ‘सुभेदार’ चित्रपटात ‘हे’ कलाकार साकारणार महत्वाची भूमिका

आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर तान्हाजी मालुसरे! स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते.

Updated: August 8, 2023 11:03 IST
Follow Us
  • Subhedar Movie Cast In Marathi
    1/18

    ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच श्री शिवराज अष्टकातील पाचवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 2/18

    नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे तर शिवचरित्राच्या महान ग्रंथातील एक झळाळते सुवर्णपान! त्यांचे भावनिक आणि कौटुंबिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या शौर्याचे पराक्रमी पान उलगडणारा दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित ‘सुभेदार’ हा चित्रपट १८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

  • 3/18

    आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर तान्हाजी मालुसरे ! स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते.

  • 4/18

    स्वतःच्या मुलाचं लग्न काढलं असताना सिंहगड मोहिमेचा सांगावा आल्यानंतर हा धैर्याचा मेरुपर्वत काळासारखा धावून गेला अन वचनाच्या पूर्ततेसाठी मागे न हटता आपला अनमोल देह स्वामी निष्ठेपायी शिवप्रभूंच्या चरणी ठेवला.

  • 5/18

    ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी गर्जना करत मोहीम फत्ते करणाऱ्या या शूर योद्ध्याला त्यांच्या कुटुंबाने ही तितकीच मोलाची साथ दिली.

  • 6/18

    ‘सुभेदार’ चित्रपटाचा ट्रेलर काल लाँच करण्यात आला आहे.

  • 7/18

    या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

  • 8/18

    अभिनेत्री मृणाल कुलकर्णी माता जिजाऊंची भूमिका साकारणार आहे.

  • 9/18

    नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका अभिनेता अजय पूरकर साकारणार आहे.

  • 10/18

    सुभेदारांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नीची सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे साकारणार आहे.

  • 11/18

    सावलीप्रमाणे आपल्या थोरल्या भावाची पाठराखण करणाऱ्या सूर्याजी मालुसरेंच्या दमदार भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र आहे.

  • 12/18

    सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नीची म्हणजे यशोदाबाईंची भूमिका शिवानी रांगोळे साकारणार आहे.

  • 13/18

    मालुसरे कुटुंबीयांचा आधारवड असणाऱ्या शेलारमामांच्या भूमिकेत अभिनेता समीर धर्माधिकारी आहे.

  • 14/18

    तान्हाजीरावांच्या आई म्हणजे पार्वतीबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री उमा सरदेशमुख तर मुलगा रायबाच्या भूमिकेत अर्णव पेंढारकर आहे.

  • 15/18

    ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे.

  • 16/18

    प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.

  • 17/18

    (सर्व फोटो सौजन्य : सुभेदार / इन्स्टाग्राम)

  • 18/18

    (हेही पाहा : ‘राजा रानीची गं जोडी’ फेम अभिनेत्रीचा काळ्या गाऊनमध्ये ग्लॅमरस लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Director digpal lanjekar shivraj ashtak fifth subhedar tanaji malusare movie cast in marathi ajay purkar photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.