-
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. श्री शिवराज अष्टक मालिकेतील या पाचव्या चित्रपटाची कथा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे.
-
‘सुभेदार’ चित्रपट येत्या २५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने नुकतीच ‘सुभेदार’च्या संपूर्ण टीमने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला हजेरी लावली होती.
-
श्री शिवराज अष्टक मालिकेतील सगळ्या चित्रपटांमध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे या मुलाखतीत अभिनेत्याला खास प्रश्न विचारण्यात आला.
-
“महाराजांचा जिरेटोप, त्यांचा पोशाख आणि एकंदर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना मनात काय भावना असते?” असा प्रश्न अभिनेता चिन्मय मांडलेकरला विचारण्यात आला.
-
या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर देत अभिनेत्याने सर्वांचे मन जिंकून घेतले.
-
महाराजांची भूमिका साकारताना ‘कृतज्ञता’ ही एकमेव भावना मनात असते असे चिन्मय मांडलेकरने सांगतिले.
-
चिन्मय पुढे म्हणाला, “श्री शिवराज अष्टक मालिकेतील सगळ्या चित्रपटांमध्ये महाराजांच्या वेशभूषेसाठी अधिकाधिक मेहनत घेतली गेली आहे.”
-
“आजही शिवराज अष्टक मालिकेतील प्रत्येक चित्रपटाच्या आधी सगळ्या कलाकारांची लूक टेस्ट होते.” अशी माहिती अभिनेता चिन्मय मांडलेकरने या वेळी दिली.
-
दरम्यान, ‘सुभेदार’ चित्रपटात अजय पूरकर, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, विराजस कुलकर्णी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. (फोटो सौजन्य : चिन्मय मांडलेकर इन्स्टाग्राम)
“छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना मनात काय भावना असते?”, चिन्मय मांडलेकरने एका शब्दात दिलं उत्तर…
“छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना…”, अभिनेता चिन्मय मांडलेकरने व्यक्त केल्या भावना
Web Title: Subhedar movie chinmay mandlekar expressed his gratitude that he got opportunity to perform chhatrapati shivaji maharaj role sva 00