-
मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवेने ठाण्यात नवीन घर खरेदी केलं आहे.
-
ऋतुजाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवं घर घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली.
-
‘मी ठाणेकर’ असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिच्या नव्या घराची झलक सर्वांना दाखवली.
-
पारंपरिक पद्धतीने आई-वडिलांसह पूजा करून अभिनेत्रीने नव्या घरात गृहप्रवेश केला.
-
गृहप्रवेशासाठी अभिनेत्रीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.
-
अभिनेत्रीच्या नव्या घराच्या खिडकीतून सुंदर व्ह्यू आणि निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळत आहे.
-
नव्या घरासाठी अभिनेत्रीने हटके नेमप्लेट बनवून घेतली आहे. पांढऱ्या रंगाच्या फुलांनी सजवलेल्या नेमप्लेटवर ‘ऋतुजा प्रतिभा राजन बागवे’ असं पूर्ण नाव लिहिलेलं आहे.
-
ऋतुजाच्या घरातील एका भिंतीवर मोठ्या अक्षरांमध्ये विठ्ठलाचं नावं लिहिलेलं आहे. या ठिकाणी अभिनेत्रीच्या आई-बाबांनी कमरेवर हात ठेवून फोटो काढला आहे.
-
दरम्यान, ऋतुजाच्या आनंदात मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सहभागी झाले होते. या सर्वांबरोबरचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सुंदर व्ह्यू, हटके नेमप्लेट अन्…, ऋतुजा बागवेने ठाण्यात घेतलं हक्काचं घर! पाहा फोटो
ऋतुजा बागवेने ठाण्यात घेतलं स्वप्नातलं घर, फोटो शेअर करत म्हणाली…
Web Title: Rutuja bagwe bought new home in thane actress shared beautiful photos of her home sva 00