-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरने अलीकडेच नव्या घरात गृहप्रवेश केला.
-
प्रसादने नुकतीच त्याच्या नव्या घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
-
प्रसाद खांडेकरच्या नव्या घराच्या गृहपूजन सोहळ्याला हास्यजत्रेतील काही कलाकार आणि घरातील कुटुंबीय उपस्थित होते.
-
नम्रता संभेराव आणि गौरव मोरे हे दोघे अभिनेत्याच्या आनंदात सहभागी झाले होते.
-
प्रसादने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याची बायको, मुलगा, आई आणि इतर कुटुंबीय पाहायला मिळत आहे.
-
“नवीन घर…अजून एक स्वप्न पूर्ण…घर शोधायला लागले १ वर्ष, घर बांधायला गेले ६ महिने, घर सजवायला गेले २ महिने, फायनली नवीन घरात शिफ्ट झालो. जुन्या दोन्ही घरांनी भरभरून दिलं…त्या दोन्ही वास्तूंचे आभार, मोरया!” असं कॅप्शन अभिनेत्याने या फोटोंना दिलं आहे.
-
प्रसादने नव्या घरासाठी चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेली नेमप्लेट तयार करून घेतली आहे.
-
घराच्या नेमप्लेटवर कलेशी संबंधित अनेक चित्रं आहेत.
-
व्हिडीओ कॅमेरा, पेन, कलेची दोन रुपं या नेमप्लेटवर पाहायला मिळतात.
-
‘श्री. आणि सौ. खांडेकर इथेच राहतात’ असं नाव अभिनेत्याच्या नव्या घराच्या पाटीवर लिहिलेलं आहे.
-
नवीन घर घेतल्यामुळे प्रसाद खांडेकरवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
नम्रता संभेराव, ऋतुजा बागवे, अमित फाळके, प्रथमेश परब या कलाकारांनी अभिनेत्याला नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘श्री. आणि सौ. खांडेकर इथेच राहतात’, ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याच्या नवीन घराची हटके नेमप्लेट, पाहा फोटो…
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतलं नवीन घर, सुंदर नेमप्लेटने वेधलं लक्ष
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame prasad khandekar bought new home see photos sva 00