-
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. ते नेहमी त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यात काय नवीन सुरू आहे याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.
-
तर आता त्यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ही नवीन सदस्य म्हणजे त्यांची नवी कोरी आलिशान गाडी.
-
राहुल देशपांडे यांनी नुकतीच नवी कोरी मर्सिडीज खरेदी केली आहे.
-
ही गाडी तब्यात घेतानाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी त्यांच्या आई-वडिलांसाठी एक खास पोस्ट लिहिली.
-
राहुल देशपांडे यांनी नुकताच त्यांच्या कुटुंबीयांबरोबर शोरूममध्ये जाऊन या गाडीचा ताबा मिळवला.
-
यावेळी त्यांची मुलगी रेणुकाने गाडीची पूजा केली.
-
तर राहुल देशपांडे यांनी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांना या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसवलं.
-
गाडीचा ताबा मिळवल्यावर राहुल देशपांडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर केक कापत या आनंदाचं सेलिब्रेशन केलं.
-
गाडी घेतानाचा हा व्हिडीओ शेअर करत राहुल यांनी आई-वाडिलांसाठी एक खास पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं, “आई-बापू, तुम्ही आतापर्यंत कायम माझ्या पाठीशी उभे राहिला आहात.”
-
“आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळे आहे.”
-
“माझ्या डोळ्यासमोर सगळ्या जुन्या आठवणी आल्या. बापू मला त्यांच्या स्कूटरवर गाण्याच्या क्लासला घेऊन जायचे. आपण चौघेजणं त्या स्कूटररून फिरायला जायचो.”
-
“आई-बापू, माझ्यावर चांगले संस्कार केल्याबद्दल आणि मला मोठ्यांचा आदर करायला शिकवल्याबद्दल धन्यवाद.”
-
“आज मला, नेहाला आणि रेणुकाला तुम्हाला तुमच्या ड्रीम कारमध्ये बसलेलं पाहून खूप अभिमान वाटत आहे.”
-
या गाडीचं इंटिरिअरही त्यांनी खूप सोबर करून घेतलं आहे.
-
आता राहून देशपांडे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावर कमेंट कर त्यांचे चाहते आणि कलाक्षेत्रातील त्यांची मित्रमंडळी त्यांच्याबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचं अभिनंदन करत आहेत.
सोबर इंटिरिअर, क्लासी लूक…; ‘अशी’ आहे राहुल देशपांडे यांची नवी कोरी आलिशान मर्सिडिज, पाहा खास झलक
राहुल देशपांडे यांनी नुकताच त्यांच्या कुटुंबीयांबरोबर शोरूममध्ये जाऊन या गाडीचा ताबा मिळवला.
Web Title: Classical singer rahul deshpande purchased brand new mercedes benz car photos get viral rnv