• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar daughter school pps

‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरची लेक कोणत्या शाळेत शिकतेय माहितेय? थोडी हटके आहे ‘ही’ शाळा

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या लेकीची शाळा आहे तरी कुठे? जाणून घ्या

September 18, 2023 19:35 IST
Follow Us
  • ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.
    1/12

    ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.

  • 2/12

    महिलांसाठी तर अरुंधती एक आयडॉल झाली आहे.

  • 3/12

    अशी ही लोकप्रिय अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

  • 4/12

    कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी परखड मतांमुळे.

  • 5/12

    सध्या मधुराणीची मुलगी म्हणजे स्वरालीच्या शाळेबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे.

  • 6/12

    अलीकडेच ‘हंच मीडिया’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी संवाद साधताना मधुराणीनं आपल्या लेकीची शाळा इतर शाळांपेक्षा कशी वेगळी आहे हे सांगितलं.

  • 7/12

    मधुराणी म्हणाली की, “माझ्या मुलीची पुण्यात वेगळ्या प्रकारची शाळा आहे. ती ज्या पद्धतीच्या शाळेत आहे, तशी शाळा मुंबईत मिळाली, तर मी तिला ताबडतोब मुंबईला घेऊन येईन.”

  • 8/12

    पुढे मधुराणी म्हणाली की, “तिच्या शाळेला कुठलाही बोर्ड नाही, अभ्यासक्रम नाही, इयत्ता नाही, वर्ग नाही, बेंचेस नाही, गणवेश नाही, अशा पद्धतीची तिची शाळा आहे.”

  • 9/12

    ‘गोकुळ’ असं त्या शाळेचं नाव असून डॉ. ज्योत्स्ना पेठकर या शाळेच्या संचालिका आहेत, असं मधुराणी म्हणाली.

  • 10/12

    “माझ्या मुलीची जी जडणघडण आहे, तिचा जो स्वभाव आहे. त्याला अनुरुप अशी ही शाळा असल्याचं,” यावेळी मधुराणीनं सांगितलं.

  • 11/12

    काही महिन्यांपूर्वी मधुराणी आपल्या मुलीच्या शाळेत कविता शिकवायला गेली होती.

  • 12/12

    याचा व्हिडीओ मधुराणीनं तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला होता.

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar daughter school pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.