Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah reality show mi honar superstar chhote ustad season 2 final round episode photos sdn

Photos: …असा रंगला ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’चा महाअंतिम सोहळा; पाहा फोटो

छोट्या उस्तादांनी आपल्या भारावून टाकणाऱ्या स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं आहे.

October 4, 2023 10:58 IST
Follow Us
  • Mi Honar Superstar Chhote Ustad 2 Final
    1/14

    स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’च्या दुसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

  • 2/14

    छोट्या उस्तादांनी आपल्या भारावून टाकणाऱ्या स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं आहे.

  • 3/14

    महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या उस्तादांमधून ६ सर्वोत्तम स्पर्धकांनी आता गाठली आहे महाअंतिम फेरी.

  • 4/14

    अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या ७ आणि ८ ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे.

  • 5/14

    जालन्याचा संकल्प काळे, अकोल्याची श्रुती भांडे, नाशिकची श्रेया गाढवे आणि सृष्टी पगारे, औरंगाबादची रागिणी शिंदे आणि भिवंडीचा काव्य भोईर या सहा जणांमध्ये महाअंतिम लढत रंगेल.

  • 6/14

    त्यामुळे सुपरस्टार होण्याचा मान कोण पटकवणार याची उत्सुकता वाढली आहे.

  • 7/14

    छोट्या उस्तादांना या पर्वात मोलाचं मार्गदर्शन केलं ते सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे यांनी.

  • 8/14

    या संगीत महारथींच्या सानिध्यात छोट्या उस्तादांवर गाण्याचे संस्कार झालेत त्यामुळे त्यांची पुढील वाटचाल दैदीप्यमान असणार यात शंका नाही.

  • 9/14

    महाअंतिम सोहळ्यात छोटया उस्तादांना साथ देण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके गायक अर्थातच रोहित राऊत, जुईली जोगळेकर, उर्मिला धनगर, प्रसेनजीत कोसंबी, मधुरा कुंभार, आणि शरयू दाते खास हजेरी लावणार आहेत.

  • 10/14

    सिद्धार्थ जाधव देखिल या महाअंतिम सोहळ्यात धमाकेदार गाणं सादर करुन धिंगाणा घालणार आहे.

  • 11/14

    याबरोबरच स्टार प्रवाहच्या परिवाराच्या उपस्थितीत सोहळ्याची रंगत द्विगुणीत होणार आहे.

  • 12/14

    तेव्हा पाहायला विसरु नका ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २’चा महाअंतिम सोहळा येत्या ७ आणि ८ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर.

  • 13/14

    (सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

  • 14/14

    (हेही पाहा : लाल रंगाच्या पैठणी ड्रेसमध्ये मृण्मयी देशपांडेचा खास लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Star pravah reality show mi honar superstar chhote ustad season 2 final round episode photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.