-
अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर क्रितीने बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
-
नातेवाईकांचा विरोध पत्करून क्रीतीने हे क्षेत्र निवडलं अन् गेल्या ९ वर्षात तिने कित्येक सुपरहीट चित्रपटात काम केलं आहे.
-
क्रीती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. सध्या इंस्टाग्रामवर तिचे ५५ मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून क्रीती तिच्या चाहत्यांशी संवाद साधते व तिच्या आयुष्याशी निगडीत अपडेट देत असते.
-
सध्या क्रीती टायगर श्रॉफबरोबरच्या आगामी ‘गणपत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या दोघांनी ‘हिरोपंती’ या चित्रपटातून एकत्रच पदार्पण केलं होतं, त्यानंतर आता ही जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
-
सध्या टायगर आणि क्रीती ‘गणपत’चं प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. नुकताच याचा टीझर आणि एक गाणं प्रदर्शित झालं ज्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता याच्या ट्रेलरची लोक आतुरतेने वाट बघत आहेत, याच निमित्त क्रीती दिल्लीला रवाना झाली आहे अन् यासाठीचा तिने खास लुक इंस्टाग्रामवर शेयर केला आहे.
-
गणपतमधल्या ‘जस्सी’ या पात्राचा एक ग्लॅमरस लुक क्रीतीने शेअर केला आहे.
-
क्रीतीने या ट्रेलर लॉंचसाठी खास डेनिमची पॅन्ट आणि वर शॉर्ट टॉप परिधान केला आहे. या डेनिम लुकमध्ये क्रीती हॉट दिसत आहे.
-
क्रीतीचा हा हॉट ग्लॅमरस लुक तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंत पडला आहे. सगळेच तिच्या या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. (फोटो सौजन्य : क्रीती सेनॉन / इंस्टाग्राम)
‘गणपत’च्या ट्रेलर लॉंचसाठी क्रीती सेनॉनचा खास हॉट डेनिम लुक; फोटो पाहून चाहते घायाळ
सध्या क्रीती टायगर श्रॉफबरोबरच्या आगामी ‘गणपत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या दोघांनी ‘हिरोपंती’ या चित्रपटातून एकत्रच पदार्पण केलं होतं
Web Title: Kriti sanon hot denim look for ganpath trailer launch event in delhi avn