-
बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री माधुरी दीक्षितने १७ ऑक्टोबर १९९९ रोजी डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं.
-
अभिनेत्रीच्या लग्नाचा आज २४ वा वाढदिवस आहे.
-
माधुरी सोशल मीडियावर नेहमी तिच्या कुटुंबाबद्दलच्या गोष्टी शेअर करत असते.
-
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माधुरीने नवऱ्याबरोबरचे काही Unseen फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
माधुरीने या फोटोंना “सुखी संसाराचं आणखी एक वर्ष” असं कॅप्शन दिलं आहे.
-
लग्न झाल्यावर अभिनेत्रीने श्रीराम नेनेंबरोबर अमेरिकेत संसाराला सुरूवात केली.
-
लग्नानंतर अनेक वर्ष माधुरी ग्लॅमर विश्वापासून दूर होती. या जोडप्याला आता अरिन आणि रयान अशी दोन मुलं आहेत.
-
अभिनेत्री आणि तिचे पती दोघेही सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात.
-
माधुरीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या फोटोंवर मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ( सगळे फोटो : इन्स्टाग्राम )
सुखी संसाराची २४ वर्ष! लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माधुरी दीक्षितने शेअर केले नवऱ्याबरोबरचे Unseen फोटो
Madhuri Dixit Anniversary : माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांचे Unseen फोटो पाहिलेत का?
Web Title: Actress madhuri dixit shared unseen photos with her husband shriram nene on the occasion of 24th anniversary sva 00